Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

Crime : कारची सर्व्हिस करण्यासाठी गेलेल्या नेत्याने किरकोळ वादातून वर्कशॉपमधील सुपरवायझरला मारहाण केली. पिस्तूल रोखत गोळ्या मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Crime news
Crime newsx
Published On
Summary
  • कार सर्व्हिसिंगवरून झालेल्या किरकोळ वादात एका नेत्याने वर्कशॉप सुपरवायझरवर पिस्तूल रोखून मारहाण केली.

  • पिस्तूलाने धमकी देतानाचा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नेते आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.

Shocking : गाडीच्या सर्व्हिसवरुन झालेल्या वादात एका नेत्याने वर्कशॉप सुपरवायझरवर पिस्तूल रोखली. शिवीगाळ करताना त्यांनी सुपरवायझरला लाथा-बुक्क्यांनी आणि पिस्तूलच्या बटने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नेत्यासह त्याच्या भावाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना लखनऊच्या चिन्हाट पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या टोयोटा वर्कशॉपमध्ये घडली आहे. सुलतानपूरचे समाजवादी पक्षाचे नेते शहाबुद्दीन उर्फ इरफान आणि त्याचा भाऊ शवेज उर्फ खुर्रम यांनी त्यांची फॉर्च्युनर कार सर्व्हिसिंग करण्यासाठी आले होते. यादरम्यान त्याचा वर्कशॉपच्या सुपरवायझरशी किरकोळ वाद झाला.

Crime news
Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. पण वाद वाढत गेला आणि शहाबुद्दीन यांनी सुपरवायझरवर पिस्तूल रोखली. पिस्तूल दाखवल्यानंतर दोन्ही भावांनी सुपरवायझरला मारहाण केली. पिस्तूलच्या बटने त्याला मारले. त्यांनी वर्कशॉपवरुन जाताना सुपरवायझरला एका आठवड्यात तुला गोळ्या घालणार अशी धमकीदेखील दिली. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट केला.

Crime news
Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

मारहाण करत पिस्तूलाने धाक देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दोन्ही भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सुलतानपूर येथील त्यांच्या घरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Crime news
माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com