Pune : ८२ कोटींची चोरी, कंपनी काढून डेटा विकला; हिंजवाडीतलं कांड कसं समोर आलं?

Pune Hinjawadi News : हिंजवाडीमधील आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी कंपनीतील डेटा चोरुन स्वत:ची कंपनी सुरु केली. त्यांनी डेटा, सॉफ्टवेअर्स १०० पेक्षा अधिक अनधिकृत वेबसाईट्सना विकला.
Pune Hinjawadi
Pune Hinjawadix
Published On

Pune Hinjawadi : पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीमध्ये ८२ कोटी रुपये किंमतीचा डेटा चोरी करण्यात आला. कंपनीमध्ये काम करणाऱ्या ३ माजी कर्मचाऱ्यांनी हा डेटा चोरी करुन स्वत:ची नवी कंपनी सुरु केली. आरोपींनी १००हून अधिक वेबसाईट्सना हा कोट्यावधींचा डेटा विकला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Pune Hinjawadi
Kalyan : १५ वर्षीय मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर जिवंत अर्भकाला कचऱ्यात फेकलं; कल्याणमध्ये २२ वर्षीय नराधमाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी नगरीमधील फ्युचरीइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध आयटी कंपनीतील गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशन यांची माहिती चोरण्यात आली. यामुळे कंपनीचे ८२ कोटींचे नुकसान झाले. एप्रिल २०२४ - ऑगस्ट २०२५ या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. या डेटाचोरीप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांच्या तपासातून कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनी चोरी केल्याचे समोर आले आहे.

Pune Hinjawadi
Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

सायबर पो.स्टे कडील दाखल गुन्हयामधील फिर्यादीच्या कंपनीमधील इंटरनेट मार्केटीग ब्रेन्ड कन्सलटिगमध्ये प्रथम नेमणुक असलेले व नंतर ASAP Semiconductors LLC या ग्राहक कंपनीशी करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या कामाकरिता प्रोजेक्ट मॅनेजर म्हणुन पदोन्नती देण्यात आलेले श्री. बिश्वजीत मिश्रा, व त्याचे सोबत सदर प्रकल्पाकरिता नेमण्यात आलेल्या विशेष टिममध्ये सागर मधुकर विष्णु, नयुम सल्लाऊद्दीन शेख, सौ. सागरिका बिश्वजीत मिश्रा, व इतर यांनी संगनमत करुन वेळोवळी केलेल्या करारनाम्याचे भंग करुन कंपनीच्या अंत्यत गोपनीय मालकी हक्कांच्या व कंपनीचा कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड व डाटा (विदा) चोरी करुन कंपनीचे मार्केटिग प्रोजेक्ट रेव्हन्यु व १०० बेकायदेशीररित्या डेव्हलप केलेल्या वेबसाईटचा मोबदला अपॉर्च्यूनिटी लॉस व इतर सेवांचे असे अंदाजे ८२ कोटीचे आर्थीक नुकसान करुन कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्युशन व सोर्स कोड यांची चोरी करुन स्वतःच्या फायदयाकरिता वापरुन संगनमताने सदरचा गुन्हा केल्याने कंपनीकडून त्यांचेविरुध्द सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं ३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२),३१६ (५), ३१८ (४), ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ४३, ६६, ७२ अन्वये कायदेशीर तक्रार दिल्याने दि. १३/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Hinjawadi
Parliament Monsoon Session : 30 दिवसांची तुरुंगवारी; CM, PM ची खुर्ची जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com