प्रमुख भारतीय विमानतळांवर जीपीएस स्पूफिंग आणि जीएनएसएसशी छेडछाड झाली.
या घटनांमुळे विमानांचे उपग्रह-आधारित नेव्हिगेशन तात्पुरते विस्कळीत झाले.
मुंबई, बेंगळुरू, हैदराबादसह अनेक शहरांमधील विमानतळांवरील उड्डाणांवर परिणाम झालाय.
भारताच्या विमानतळावर सायबर अटॅक झाला होता, असं विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मान्य केलंय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, भारत सरकारने मान्य केले की देशातील अनेक प्रमुख विमानतळांवर जीपीएस स्पूफिंग आणि जीएनएसएसमध्ये छेडछाड झाल्याच्या घटना घडल्या. ज्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला.
मुंबई, कोलकाता, हैदराबाद, अमृतसर, बेंगळुरूसह अनेक शहरांमधील विमानतळांवरून स्पूफिंगच्या तक्रारी आल्यात. हा एक सायबर अटॅक झाला होता. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. विमानांचे ऑपरेशन्स आणि त्यांचे स्थान सध्या उपग्रह-आधारित नेव्हिगेशन सिस्टमद्वारे निश्चित केले जाते. जीपीएस स्पूफिंग आणि जीएनएसएसमधील छेडछाडीमुळे ही सिस्टम विस्कळीत होत असते.
मागील वर्षी दिल्ली आणि देशातील अनेक विमानतळावरील जीपीएसशी छेडछाडीच्या घटना घडल्या होत्या. २०२३ मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून जीपीएस जॅमिंग किंवा स्पूफिंगच्या कोणत्याही संशयास्पद घटनेची तक्रार करणे विमान कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर कोलकाता, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई सारख्या प्रमुख विमानतळांवरून अधिकाऱ्यांना सतत अपडेट मिळत आहेत.
खासदार एस. निरंजन रेड्डी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, मंत्र्यांनी पुष्टी केली की दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) रनवे १० वर उतरताना काही विमानांनी GPS स्पूफिंगची तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की, या उड्डाणांना आपत्कालीन प्रक्रियांकडे वळावे लागले. त्यांनी सांगितले की या उड्डाणांना आपत्कालीन प्रक्रियांकडे वळावे लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.