Central Railway Saam Tv
देश विदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; 'या' मार्गावरील अनेक गाड्या रद्द, पाहा लिस्ट

Indian Railways Cancels Multiple Trains: १ डिसेंबर ते ३ मार्चदरम्यान अनेक गाड्या धावणार नाहीत. हिवाळ्यातील धुक्यामुळे उत्तर मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या असल्याची माहिती.

Bhagyashree Kamble

  • धुक्यामुळे उत्तर मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत.

  • १ डिसेंबर ते ३ मार्चदरम्यान 'या' ट्रेन्स धावणार नाहीत.

  • या निर्णयाचा परिणाम उत्तर भारतातील प्रवाशांना होणार आहे.

देशभरात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ट्रेन प्रवास सोयीस्कर, परवडणारा आणि आरामदायी असतो. त्यामुळे लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेची निवड करतात. परंतु, याच प्रवासादरम्यान, अनेकदा प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी ट्रेन उशीरा धावतात. किंवा रद्द होतात. ऐन दिवाळीत रेल्वेनं काही ट्रेन रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

हिवाळ्यात दाट धुक्यामुळे अनेक वेळा ट्रेन रद्द कराव्या लागतात. यंदाही हाच पॅटर्न दिसून येत आहे. पुढील काही महिन्यांसाठी अनेक गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही दिवाळीनंतर किंवा डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

उत्तर मध्य रेल्वेनं थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर खालील गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. या गाड्या १ डिसेंबर २०२५ ते ३ मार्च २०२६ या दरम्यान धावणार नाहीत. रेल्वेनं घेतलेल्या या निर्णयाचा फटका दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रवाशांना बसणार आहे.

रद्द केलेल्या गाड्यांबाबत माहिती

  • काठगोदाम ते कानपूर सेंट्रल ट्रेन क्रमांक १२२१० ८ डिसेंबर ते २३ फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

  • कानपूर सेंट्रल ते काठगोदामपर्यंत धावणारी ट्रेन क्रमांक १२२०९ ९ डिसेंबर ते २४ फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

  • हटिया ते आनंद विहार ट्रेन क्रमांक १२८७३ १ डिसेंबर ते २६ फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

  • आनंद विहार ते हटिया ट्रेन क्रमांक १२८७४ २ डिसेंबर ते २७ फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच भारतीय खेळाडूचा राजीनामा, १७ वर्षाच्या करिअरचा शेवट

Maharashtra Live News Update : - नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमवेत अंबादास दानवेंनी साजरी केली दिवाळी

Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

SCROLL FOR NEXT