Bihar Politics Latest Marathi News Saam TV
देश विदेश

Political News: बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार? सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली, नेमकं काय घडतंय?

Satish Daud

Bihar Politics Latest Marathi News

बिहारमधील सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी RJD आणि JDU मधील मतभेद तीव्र होऊ लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये भाजपने सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढवल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू मिळून पुन्हा सरकार बनवू शकतात. रविवारी किंवा सोमवारी राजभवनात राजभवनात शपथग्रहणाचा समारंभ होऊ शकतो.

सीएम नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचबरोबर सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं. भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती देखील सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (Latest Marathi News)

विशेष बाब म्हणजे, केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची मोट बांधली होती. देशभरातील भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करण्यात नितीश कुमार यांचा खूप मोठा सहभाग होता. मात्र, आता नितीश कुमारच एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा रंगल्यानंतर इंडिया आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

बिहार विधानसभेत कुणाचा दबदबा?

बिहारमध्ये २०२० मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये एनडीएला बहुमत मिळालं. मात्र ७ ऑगस्ट २०२२ रोजी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत सरकार स्थापन केलं. महाआघाडीला १६० आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे कोणतीही अडचण आली नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे.

हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

Amruta Khanvilkar : पाहून तुझं रुप काळजाची वाढली धाकधुक

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला तगडा झटका! राजेंद्रकुमार गावितांचं अखेर ठरलं, काँग्रेसशी 'हात'मिळवणी!

Relationship With In Laws: मुलीचं लग्न झाल्यानंतर जावयाला चूकुनही 'या' गोष्टी बोलू नका; नात्यामध्ये कटूता येण्याचा धोका

SCROLL FOR NEXT