Modi Retirement Buzz: आता पुन्हा एकदा मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरलाय आहे आणि त्याला कारण ठरलंय मोहन भागवत यांचं वक्तव्य.मात्र, मोहन भागवतांनी नेमकं काय म्हटलंय? आणि त्यावरुन विरोधकांनी मोदींना कोणता टोला लगावलाय? पाहूयात.
सरसंघचालक मोहन भागवतांनी(Mohan Bhagwat) पुन्हा एकदा निवृत्तीच्या मुद्द्यावर चर्चा छेडलीय.अंगावर पंचाहत्तरीची शाल पडली की, थांबलं पाहिजे, असं म्हणत मोहन भागवतांनी अप्रत्यक्षपणे थेट मोदींच्या निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगलीय.
याच वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी हे वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यापार्श्वभुमीवर मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य हा मोदींना इशारा आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय.
खरंतर मोदी(Modi)-शाहांनी भाजपची कमान हाती घेतल्यानंतर पंचाहत्तरी पूर्ण झालेल्यांना निवृत्त करण्याचा अलिखित नियम केलाय. त्यामुळे 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवलं जातं. आता सप्टेंबरमध्ये मोदींची पंचाहत्तरी पूर्ण झाल्यानंतर ते निवृत्त होणार की कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पदावर कायम राहणार? याचीच देशभरातील नागरिकांना उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.