पुणे आणि पिंपरी-चिंचवडची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीने एक जूनपासून तिकिटाच्या दरात वाढ केली. मात्र,सेवेचा दर्जा सुधारण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
जून महिन्यात बस ब्रेक डाउन होण्याच्या २४०० घटना घडल्या आहेत.
पीएमपी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि
पीएमपीआरडीए मार्गावर बस सोडण्यात येतात.
गेल्या दोन महिन्यांत ब्रेकडाउन झालेल्या बसमध्ये ७० टक्के बस या ठेकेदारांच्या असल्याचे दिसून आले आहे..
मे महिन्यात ठेकेदारांच्या बस ब्रेक डाउन होण्याच्या १४०० घटना घडल्या. जूनमध्ये हाच आकडा १६९५ होता.
या दोन महिन्यांत मिळून पीएमपीच्या स्वमालकीच्या बस ब्रेक डाउन होण्याच्या १२७४ घटना घडल्या.त्यामुळे ठेकेदारांच्या बससेवेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला घालण्यात येत आहे साकडं
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी जोरदार घोषणाबाजी
राहाता तालुक्यातील लोणी गावाजवळ असलेल्या सादतपुर शिवारात शेतकरी पती-पत्नीचा एकाच दिवशी गूढ मृत्यू झालाय.. पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला.. मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
- पुलाचा भराव संततधार पावसात वाहून गेल्याने पुलाची दुरवस्था
- पुलाच्या दुरावस्थेन नागरिकांच्या आवागमनाचा प्रश्न
- पंधरा दिवसांपूर्वीच पुलाच काम झाल्याची नागरिकांची माहिती
- उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
- नागरिकांना वाहतुकीसाठी अडचण
- बांधकामच्या पंधरा दिवसात भरावं वाहून गेल्याने कामावर प्रश्नचिन्ह
- तात्काळ पर्यायी व्यवस्था किंवा दुरुस्ती करून देण्याची मागणी
लाखो मुंबईकरांना कामावर पोहोचवण्यासाठी मुंबईत बेस्ट सेवा कार्यरत आहे बेस्ट प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कंत्राटदाराच्या माध्यमातून चालक नेमले आहेत मात्र चालकांना कंत्राटदारांकडून अर्धवट पगार आणि अपुरे मानधन मिळत असल्यामुळे आज सकाळपासूनच मागाठाणे आणि गोराई डेपोतील 300 पेक्षा अधिक चालक संपावर गेले आहेत यामुळे मुंबईकरांना सकाळपासूनच प्रवासावेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदार युनिव्हर्सल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक तारांजीत सिंग सरदार हे चालकांना नोकरीवर ठेवताना 25000 इतका पगार देईल असं सांगतो मात्र प्रत्यक्षात कामगारांना 21 हजारापेक्षाही कमी पगार देत असल्यामुळे या कामगारांनी कंत्राटदार हटाव असा नारा देत सकाळपासूनच संप पुकारला आहे. जोपर्यंत कंत्राटदार बदलला जात नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका चालकांनी घेतली आहे.
पुणे रेल्वे स्टेशनसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला करून झालेल्या विटंबनेच्या घटनेचा राष्ट्र सेवा दल, छात्रभारती व गांधीवादी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय निषेध आंदोलन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.या आंदोलनात राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व गांधीविचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- मुबंई नाका पोलिसात करण्यात आलीय घटनेची नोंद
- 15 दिवसांपूर्वीची घटना, अद्यापही मुलीचा शोध लागला नसल्यानं पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
- निरीक्षण गृहातील संरक्षण भिंत आणि सुरक्षेचे जाळे तोडून मुलगी बाहेर कशी गेली? याबाबत उपस्थित केला जातोय प्रश्न
धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकारणावर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धुळे न्यायालयामध्ये पोलिसांच्या भूमिके विरोधात धुळे शहराचे माजी आमदार तथा ठाकरे गट शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी याचिका दाखल केलेली होती, आणि या याचिकेवर न्यायालयाची सुनावणी पार पडली असून न्यायालयाने गोटे यांच्या बाजूने विचार करत कलम 308 खाली खंडणी गोळा करण्याच्या कलमाखाली गुलमोहर प्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल करा असे आदेशित केले आहे,
गेल्या अनेक दिवसांपासून उन्मळून पडलेले झाड सातपायरी घाटात जैसे थे परिस्थितीत....
अनेक ठिकाणी पडलेले या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात घाटात वाहतूक कोंडीची समस्या....
तोरणमाळ घाटात अनेक ठिकाणी चिखलाचे रस्ते तर पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचलेल्या परिस्थितीत...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी ते गाजीपुर रस्त्याचे काम सुरू आहे
या रस्त्याने मुरूम व गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली पार्डी येथे रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्ता असा चिखलमय झाला आहे
त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या चिखलमय रस्त्याने पायदळ जाणे ही कठीण झाली आहे
अनेक वाहनधारकाचे छोटे-मोठे अपघातही झाल्याच्या घटना घडत आहे.
विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत आहे.
शिक्षण विभागाकडून दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा केला जात असताना नाशिकच्या मालेगावातील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली असून, शाळेच्या अनेक इमारती मोडकळीस आल्या तर अनेक वर्गखोल्यांचा स्लॅब कोसळला तर, भीतींना तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागते. पावसामुळे शाळा परिसरात चिखल साचल्याने खेळायला मैदान नाही चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागते. महापालिका शिक्षण मंडळ त्याकडे दुर्लक्ष करत आहे.मालेगावात महापालिका शिक्षण मंडळाच्या 36 इमारतीमध्ये 81 शाळा भारतात एकूण 16 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात.दहापेक्षा जास्त इमारतींची दुरावस्था झाली आहे.त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे
- गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी केल्याने नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती ओसरायला सुरवात
- विसर्ग घटवल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट
- मात्र अद्यापही रामकुंड, गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम
- गंगापूर धरणातून सुरूय ४४१ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ धरणांमधून करण्यात येतोय पाण्याचा विसर्ग
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे 350 वर्षापासूनची परंपरा आजही कायम आहे, आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी पौर्णिमेला गावात श्री संत नारायणजी आप्पा महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आयोजन करण्यात येत, तर या पालखी सोहळ्याला परिसरातील मोठ्या संख्येने भाविक ढाळेगावात दाखल होतात, ढाळेगाव जिल्ह्यातील धाकट पंढरपूर या नावाने ओळखले जाते..
गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी कल्याण विद्यापीठ उपकेंद्राला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचं नाव; नामकरण फलक लावत केले आंदोलन
२०१७-१८ मध्ये मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये उपकेंद्राला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला असून पुढील आठ दिवसात अधिकृत नामफलक लावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार... ठाकरे गटातील विद्यार्थी सेनेचा विद्यापीठाला इशारा
पंढरपूर तालुक्यातील किरण पुरुषोत्तम घोडके याला 10 लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. फिर्यादीकडू दहा लाख रूपयांची खंडणी स्विकारतानाचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे.
या प्रकरणी आरोपी किरण घोडके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची व आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीने एक कोटींची खंडणी मागितली होती खंडणी. त्यातील अॅडव्हान्स म्हणून 10 लाख रुपये घेताना किरण घोडके याला पकडले. या प्रकरणी नितीन सरडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी किरण घोडके हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगार आंदोलनात सहभागी होता.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील इंदिरा नगरातील रस्ता हा पायी चालण्याच्या लायकिचा राहिलेला नाही, गावातील छोट्या छोट्या रस्त्यावर काही ठिकाणी काँकरीटचे रस्ते आहेत तर काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसविले आहे परंतु हा रस्ता अजून पर्यंत कित्तेक वर्षा पासुन बनलेलाच नाही, आज पर्यंत अनेक सरपंच व मेंबर आपले पाच वर्षे सत्ता भोगून चालले गेले परंतु या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही इंदिरा नगर मधील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतमध्ये या रस्त्याचे दुखणे मांडले होते परंतु आज पर्यंत याकडे लक्ष दिलेले नाही.शासनाने याची चौकशी करावी असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
तीन दिवसापासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात सोयाबीन,कापूस, तूर या पिकाचे नुकसान झाले आहे, तिवसा तालुक्यातील शेंदुर्जना बाजार मौजातील पाण्याखाली असल्याने शेंदूरजना बाजार येथील जितेंद्र चौधरी यांचे गावाला लागत तीन एकर शेत आहे. ज्यामध्ये त्यांनी पराटीची लागवड केली होती तसेच गोपाल देवळे यांचे दोन एकर शेत असून त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली परंतु या दोन्ही शेती सततधार पावसामुळे पाण्याखाली आल्याने शेताताला तलावाचे स्वरूप आले आहे.तीन दिवसापासून सुरु असलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील लहान मोठ्या नाल्याना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरून नुकसान झाले आहे.
सिडकोणी काढलेल्या 26हजार घरांच्या लॉटरीची किंमत भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात असल्यामुळे त्यामुळे सिडकोची अनेक घरं सध्या पडूनच आहेत याबाबत विधान परिषदेमध्ये सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यात याव्यात या दृष्टीने आमदार प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील, यांनी सुद्धा सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आता सिडकोच्या घराच्या किमती सरकार कमी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
लातूरच्या चाकूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि चाकूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांचा आज मुंबई येथे भाजपात प्रवेश होणार आहे.. दरम्यान या प्रवेशामुळे चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे.. तर आज सकाळी या कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे
पोलादपुर आणि महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यात पायटा गावचे हद्दीत मोठी दरड कोसळली आहे तर अजून ही दरडीला धोका कायम असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अमरावती शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत महापालिकेने मोठी कारवाई करत कडक संदेश दिला आहे. उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व बाजार परवाना विभागाच्या विशेष पथकाने सक्करसाथ येथील शनी मंदिराजवळील जय ट्रेडर्स या दुकानावर धाड टाकून सुमारे १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. कारवाईदरम्यान संबंधित दुकान सील करण्यात आले. राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई अनिवार्य आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही बंदी अत्यंत आवश्यक असून, नियमांचे पालन करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे असे आवाहन महानगरपालिकेने केले
भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पाण्याखाली बुडालेले आहेत व जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपालाची शेती करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच धानाच्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झालेले धान सुद्धा वाहून गेले आहेत. अनेक धुरे वाहून गेले आहेत. त्यांची तलाठी विभागाकडून चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
खाजगी सावकार विरोधातील तक्रार पोलिसांनी न घेतल्याने विष घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप
संगीता सतीश पडिले आणि व्यंकटेश सतीश पडिले अशी दोघांची नावे
धाराशीवच्या आनंदनगर पोलिसात खाजगी सावकाराविरोधात तक्रार द्यायला गेल्यास तक्रार न घेतल्याने उचलल पाऊल
दोघांना धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल , आईची प्रकृती गंभीर
पोलिसांनी पीडित कुटुंबाचे आरोप फेटाळले , प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करू अशी माहिती दिली
यवतमाळ जिल्ह्यातील सोहळाही तालुक्यांमध्ये गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले असून 2 हजार 414 हेक्टरवर शेत पिकांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.संततधार पावसाचा साडेतीन हजार शेतकऱ्यांना फटका बसलाय.तर 39 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.