नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Navi Mumbai Crime News: नवी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तिघांना अटक झाली असून, अल्पवयीन मुलींसह पाच महिलांची सुटका करण्यात आली. सोशल मीडियातून ग्राहकांना आकर्षित केलं जात होतं.
Police Crack Major brothel network
Police Crack Major brothel networkSaam Tv News
Published On

नवी मुंबई पोलिसांनी एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या कारवाईत काही अल्पवयीन मुलींसह ५ महिलांना वेश्याव्यवसायाच्या कचाट्यातून मुक्त केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बेकायदेशीर व्यवसाय चालवणारे लोक सोशल मीडियावरून ग्राहकांना आमिष दाखवत होते.

ग्राहकांना यानंतर वाशी, नेरूळ आणि तुर्भे यांसारख्या भागात लॉज किंवा हॉटेलमध्ये रूम बुक करण्यास सांगितले. त्यानंतर महिलांना त्या ठिकाणी पाठवत असे. आरोपी ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार रूपये आकारायचे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या रॅकेटचा भंडाफोड करण्याचा प्लॅन आखला.

Police Crack Major brothel network
Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

८ जुलै रोजी पोलिसांनी तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला, आरोपींनी एका महिलेला पाठवताच पोलिसांनी छापा टाकला. तसेच महिलेची सुटका केली. नंतर नेरूळ येथील एका फ्लॅटमधून पोलिसांनी ४ महिलांची सुटका केली. या कारवाईत प्रमुख सूत्रधार, एक मध्यस्थ आणि ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.

Police Crack Major brothel network
हायवेनंतर जंगल! TMC काँग्रेस नेता अन् भाजप महिला नेता एकाच कारमध्ये; रात्री नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

या प्रकरणातील ३ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांना पोलिसांनी १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नवी मुंबईत खळबळ उडाली असून, आणखी काही वेश्याव्यवसायाच्या निगडीत रॅकेट सक्रीय आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com