देश विदेश

'अंगाला हात लावू नको, मी....' मधुचंद्राच्या रात्री नवरीचा इशारा, नवरा पोलिसांत पोहोचला

Marriage Troubles: उत्तर प्रदेशातील बरेलीत एक चकित करणारी घटना घडली आहे, जिथे नवविवाहित पत्नीने लग्नाच्या पहाटेच नवऱ्याला धक्कादायक सत्य सांगून हादरवून सोडलं.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील बरेलीच्या बाराद्वारी पोलीस स्टेशन हद्दीत एक अजब आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका नवविवाहित तरुणासाठी लग्नाची पहिली रात्र अक्षरशः धक्का देणारी ठरली. त्याच्या पत्नीने लग्नानंतरच असा एक रहस्य उघड केलं की त्याचं भानच हरपलं. मनःस्ताप झालेल्या तरुणाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या पहिल्याच रात्री पती जेव्हा पत्नीच्या जवळ बसला, तेव्हा तिने त्याला धक्का देणारा इशारा दिला. ती म्हणाली, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर मी विष घेऊन आत्महत्या करेन. तिच्या या धमकीमुळे पती हादरला आणि पूर्णपणे गोंधळून गेला.

या प्रकरणी तक्रार करताना पतीने पोलिसांना सांगितले की, जानेवारी महिन्यात त्याचे लग्न झाले, मात्र लग्नानंतर लगेचच पत्नीने त्याच्याशी अंतर राखायला सुरुवात केली. काही दिवसांतच तिने कबूल केले की तिचं आधीपासूनच दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि कुटुंबाच्या दबावाखालीच तिने हे लग्न स्वीकारलं. तिने पतीला धमकावत सांगितले की, जबरदस्ती केली तर ती आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे पती पूर्णपणे घाबरला आणि कुटुंबीयांना हे सर्व सांगितले.

त्या तरुणाने सांगितले की, जेव्हा त्याने पत्नीच्या वागणुकीविषयी सर्व गोष्टी तिच्या कुटुंबीयांना सांगितल्या, तेव्हा त्यांनी याचे गांभीर्याने न घेतल्याने उलट त्याला धमकावले. पत्नी वेळोवेळी आत्महत्येची धमकी देते, तर तिचे वडील खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवतात. त्यामुळे त्याच्यावर सतत मानसिक तणाव निर्माण होतो आहे.

त्याने असा आरोप केला की, केवळ पत्नीच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंबच त्याला त्रास देत आहे आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे. या संपूर्ण प्रकरणावर तरुणाने बारादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पत्नीसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की लग्नानंतरपासूनच घरात सतत तणावाचे वातावरण होते आणि मानसिक त्रास सुरू होता. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT