Akola News: क्रुरतेचा कळस! थेट मुक्या प्राण्यांना खाण्यातून दिलं विषारी औषध, 25 पेक्षा अधिक कुत्र्यांचा दुर्देवी मृत्यू

Poisoned Dogs: अकोल्यात निर्दयी प्रकार समोर आला असून मुक्या प्राण्यांना विषारी औषध देऊन मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Akola News
Akola Newsgoogle
Published On

क्रुरतेचा कळस गाठनारी आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. अकोल्यात मुक्या प्राण्यांना विषारी औषध देत जिवे ठार मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका व्यक्तीने क्रुरतेचा कळस गाठला अन् थेट या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिलं असल्याची माहिती समोर आली आहे.

जवळपास 25 पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्याने विषबाधा झाली आहे आणि अगदी २४ तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही जनावरे अजूनही गंभीर स्थितीत आहेत. या प्रकरणाची अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. अकोल्यातल्या गुडधी भागात मुक्या प्राण्यांसोबत हा क्रूरतेचा प्रकार घडला आहे.

Akola News
Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा हजारो हेक्टर शेतीला फटका; एका रात्रीत पिकं आडवी झाली, बळीराजाच्या डोळ्यात पाणी

अगदी रस्त्याने जाताना मोकाट कुत्रे आपल्याकडे पाहून भुंकतात म्हणून हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतये. मात्र या घटनेनं परिसरातून मुक्या श्वाना बाबत हळहळ तर मारेकर्‍यांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी संशयित व्यक्तीची CCTV फुटेज पोलिसांना दिले. भाजपचे पदाधिकारी आणि संदीप गावंडे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत अशाप्रकारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

Akola News
Akola News: अकोल्यात सफरचंद शेतीला फटका! वाऱ्यामुळे सफरचंद गळून पडले; तर गहू, मकासोबत इतर पिकांनाही मोठा फटका

दरम्यान, काल रात्री हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. गुडधी परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अनेक कुत्र्यांची मृत्युमुखी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेची तपासणी केली असता एक व्यक्ती क्षणांना काहीतरी खाण्यासाठी देत आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आलं. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते? हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com