Akola News: अकोल्यात सफरचंद शेतीला फटका! वाऱ्यामुळे सफरचंद गळून पडले; तर गहू, मकासोबत इतर पिकांनाही मोठा फटका

Apple Farming: अकोल्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यात अवकाळी पावसाने हाहा:कार माजवला आहे. विशेषतः ऐदलापूर शेत शिवारातील सफरचंद शेतीला मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
Apple Farming
Apple Farming
Published On

अक्षय गवळी/साम टीव्ही न्यूज

अकोल्यातल्या तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर शेत शिवारात सफरचंद शेतीला मोठा फटका बसला आहे. नवनीत चांडक यांच्या सफरचंद शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अक्षरशः झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडले. दरम्यान तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी, दानापूर, तळेगाव बाजारसह आदी गावांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा आणि केळी बागा देखील वाऱ्यामुळे उध्वस्त झाले. रात्री उशिरा तेल्हारा आणि अकोट तालुक्यात अवकाळी पावसासह जोराचा वारा झाला होता. याच वाऱ्यामुळे अक्षरशः मका आणि केळी बागासह पपई बाग उध्वस्त झाल्या. शेतात तोडणी करून कापणीसाठी ठेवलेल्या मका पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे.

Apple Farming
'काय घ्यायचा तो निर्णय चार आठवड्यात घ्या', जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेबाबत उच्च न्यायालयाचे आदेश

दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात पावसाचा तडाका पाहायला मिळाला आहे. या आधीही अकोल्यातल्या मुर्तीजापुर बार्शीटाकळी आणि बाळापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्या पाठोपाठ आता तेल्हार्याला आणि अकोट तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पुन्हा बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

Apple Farming
Solapur : भाजपचा वाद चव्हाट्यावर, माजी मंत्री सुभाष देशमुखांचा स्वपक्षातील नेत्यांना सूचक इशारा, नेमकं प्रकरण काय?

कालचं बाळापुर तालुक्यात शेतकऱ्यांचं होतं नुकसान

बाळापुर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर होता. याशिवाय सोबत वारा देखील वाहत होता. या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दरम्यान, वाऱ्यामुळं केळी बागा पडल्या होते. अनेक केळीचे घड अक्षरश: मातीत भिजल्या गेल्याने पूर्णतः नुकसान झालं आहे. जवळपास एकरी ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांच नुकसान झालं.

Apple Farming
Special Trains: प्रवाशांना मोठा दिलासा! विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या आणखी तीन महिने धावणार

अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यावर आली होती, मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडं ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली होती. तर काढणी करून कापण्यासाठी ठेवण्यात आलेला कांदा पिकाचे देखील शेतातलं मोठं नुकसान झालं होतं. तामशी गावातच शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान पाहायला मिळालं होतं. मिथुन काळे या शेतकऱ्याचा जवळपास ४०० क्विंटल कांदा पूर्णतः पाण्यात भिजला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com