Judgment of Divorce Saam TV
देश विदेश

पत्नीचं दारू पिणं ही पतीसाठी क्रूरता नाही! घटस्फोटाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय, पाहा नेमकं प्रकरण काय?

पती-पत्नी दीर्घकाळापासून वेगळे राहत असल्याने उच्च न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. यावर त्याग केल्याच्या कारणावरून निकाल देण्यात आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पती-पत्नीमधील घटस्फोट प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी दिली आहे. यामध्ये न्यायालयाने पत्नीला दारू पिण्याच व्यसन असेल तर ती पतीविरुद्ध क्रूरता नाही, अशी म्हटलंय. दारूच्या नशेत पत्नीने पतीसोबत अयोग्य वर्तन केलं नाही तर त्याला क्रूरता मानता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पती-पत्नी दीर्घकाळापासून वेगळे राहत असल्याने उच्च न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. यावर त्याग केल्याच्या कारणावरून निकाल देण्यात आला आहे.

काय होती याचिका?

पत्नीपासून वेगळं होण्यासाठी पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नी दारू पिते आणि न सांगता मैत्रिणींसोबत वेळ घालवते, अशी याचिका पतीच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. यावेळी पतीने याचिकेमध्ये याला क्रूरता म्हटलं होतं. दरम्यान यावर उच्च न्यायालयाने पत्नीला दारूचे व्यसन असेल आणि तिने चुकीचं वर्तन केलं नसेल, तर ती क्रूरता मानली जाणार नाही, अशी टिप्पणी केली.

यावेळी दारूच्या नशेत असताना पत्नीने आपलं काही चुकीचं केलं आहे, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा पतीने उच्च न्यायालयात सादर केला नाही.

क्रूरतेचा आरोप लावण्यात आला होता

पतीने न्यायालयात याचिकेमध्ये, पत्नीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप करून त्याला सोडून दिलं होतं असं नमूद करण्याक आलं होतं. त्यामुळे त्यांना घटस्फोट हवा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठासमोर झाली.

यावेळी क्रूरता आणि त्याग यात खूप फरक आहे, असंही न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे. पत्नी अतर पुरुषाशी बोलत असते, असा आरोपही पतीने पत्नीवर केला होता.

मित्राशी बोलण्याच्या मुद्द्यावर हायकोर्टाने सांगितलं की, पत्नीला आलेले कॉल हे पतीवर क्रूरता घडवून आणणाऱ्या पुरुष मित्राचे होते हे सिद्ध करणारी कोणतीही नोंद नाही. हे दोघेही लग्नाच्या एका वर्षापासून वेगळे राहतायत. जे हिंदू विवाह कायद्यांतर्गत त्याग केल्यासारखं मानले जाईल, असं न्यायालयाने म्हटलंय.

पत्नीचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही ज्यामुळे ती परत येणार नसल्याचे स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत दोघांना घटस्फोटाची परवानगी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT