Shocking News: वडिलांची नजर चुकली अन् अनर्थ घडला, मोबाइलमुळे गेला चिमुकलीचा जीव

Mobile Distraction Causes Heartbreaking Accident: अंघोळीच्या टबमध्ये बुडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
Shocking News:  वडिलांची नजर चुकली अन् अनर्थ घडला, मोबाइलमुळे गेला चिमुकलीचा जीव
Mobile distraction causes heartbreaking accidentSaamtv
Published On

मोबाईलमुळे एका चिमुकलीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडली आहे. या चिमुकलीचा टबमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना हरियाणाच्या इंप्लाइज कॉलनीमध्ये घडली आहे. चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. 'माझ्या चुकीमुळेच मुलीचा जीव गेला. तिला एकटं सोडायला नव्हतं पाहिजे होतं.', अशी रडत रडत प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंप्लाइज कॉलनीमध्ये विक्रम आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. नेहमीप्रमाणे विक्रम आपल्या ११ महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन अंघोळ करायला बाथरूममध्ये गेला होता. नळाखाली ठेवलेल्या मोकळ्या टबमध्ये त्याने मुलीला बसवले. त्याचवेळी मोबाइलची रिंग वाजली. त्यामुळे विक्रम मुलीला टबमध्ये तसंच ठेवून फोन कुणाचा आला हे बघण्यासाठी गेला.

विक्रम फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त होता. तेवढ्यात विक्रमचा ४ वर्षांचा मुलगा बाथरूममध्ये गेला. त्याने नळ चालू केला. चिमुकली टबमध्ये बसली होती आणि टबमध्ये पाणी पडत राहिले. काही वेळानंतर विक्रमची पत्नी रेखा बाथरूमध्ये गेली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. ती जोरजोरात रडू लागली. चिमुकली पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडाली होती. विक्रम आणि त्याच्या पत्नीने तात्काळ चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये नेले पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषीत केले.

या घटनेमुळे विक्रमच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलीच्या मृत्यूनंतर याचा दोष विक्रम स्वत:वर घेत आहे. 'ही माझी चूक होती. मला माझ्या मुलीला एकटीला सोडायला नको होते.' असे विक्रमने सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका छोट्याच्या निष्काळजीपणामुळे चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष देणं गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com