Husband-Wife Drama Saam TV
देश विदेश

Shocking News: माझ्या नवऱ्याची बायको होशील का? पत्नीकडून तरुणीला विचारणा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Husband-Wife Drama: महिलेने तरुणीचे घर गाठलं आणि माझ्या नवऱ्याची बायको होशील का? असं म्हणत तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. सध्या हे प्रकरण पोलिसांत पोहचलं आहे.

Satish Daud

Husband Demanding Wife Second Marriage

गरोदरपणात पत्नीची देखभाल करण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर पतीचं नकळत प्रेम जडलं. रात्रंदिवस तो फक्त तिचाच विचार करू लागला. त्याचं कामातही व्यवस्थित मन लागत नव्हतं. काही दिवसांनी तरुणी तिच्या घरी परतली. यामुळे महिलेचा पती नैराश्यात गेला. दरम्यान, पत्नीने त्याला दुःखाचे कारण विचारले असता, पतीने तिला सगळंच सांगून टाकलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गरोदरपणात तुझी काळजी घेण्यासाठी आलेली तरुणी मला खूपच आवडली असून तिच्यासोबत माझं लग्न झालं नाही, तर मी माझा जीव देईन अशी धमकीच महिलेच्या पत्नी तिला दिली. पत्नीचं बोलणं ऐकूण महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने तरुणीच्या घरी धाव घेत, तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर जिल्ह्यात घडला आहे. पतीचं तरुणीसोबत लग्न लावण्यासाठी पत्नी हट्टच धरून बसली आहे. ती कुणाचंही ऐकण्यास तयार नाहीये. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत पोहचलं आहे. सध्या पोलीस या महिलेची समजूत काढत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूर जिल्ह्यातील सदर बाजार परिसरात सदरील महिला तिच्या पती आणि मुलीसह राहते. काही दिवसांपूर्वीच या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूतीदरम्यान (Pregnancy) महिलेची देखभाल करण्यासाठी तिच्या माहेरकडील एक तरुणी तिच्या घरी आली होती.

यावेळी नकळत महिलेच्या पतीचे मन या तरुणीवर जडलं. रात्रंदिवस तो फक्त तरुणीचाच विचार करू लागला. पण जेव्हा तरुणी तिच्या घरी गेली तेव्हा महिलेचा पती नैराश्यात गेला. त्याने जेवणही करणे सोडले होते. पत्नीने त्याला कारण विचारलं असता, सदरील तरुणीसोबत माझं लग्न झालं नाही, तर मी माझा जीवच देईन, अशी धमकी त्याने पत्नीला दिली.

पतीचं बोलणं ऐकून पत्नीला काळजी वाटू लागली. तिने तरुणीचे घर गाठत माझ्या नवऱ्याची बायको होशील का? असं म्हणत तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबियांनी या महिलेला हाकलून लावलं. यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली.

माझ्या पतीचे तरुणीसोबत लग्न लावून द्या, असा हट्टच महिलेने पोलिसांसमोर धरला. सध्या पोलीस तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, महिला कुणाचेही ऐकण्यास तयार नाहीये. पहिलं लग्न झालं असताना घटस्फोट झाल्याशिवाय तरुणाचे दुसरं लग्न नेमकं लावायचं तरी कसं? असा पेच पोलिसांसमोर पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT