Accused arrested after allegedly exploiting a widow and blackmailing her with obscene videos in Madhya Pradesh’s Sagar district. saam tv
देश विदेश

लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् तिच्या मुलीसोबत...;

Widow Exploited On False Promise Of Marriage In Sagar: सागर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली असून, लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे शोषण करण्यात आले. आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या मुलीवरही वाईट नजर ठेवली होती.

Omkar Sonawane

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फसणारी एक घटना समीर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेचे वर्षानुवर्षे शोषण करणाऱ्या नराधमाने आता तिच्या मुलीवरही वाईट नजर ठेवली होती. पीडित महिलेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सागर जिल्ह्यातील मोतीनगर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विधवा महिलेने 5 मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पतीच्या निधनानंतर तिची ओळख आरोपी रविकांत शर्मा याच्याशी झाली. सुरुवातीला आरोपीने महिलेबद्दल सहानुभूती दाखवली आणि हळूहळू तिच्या घरी येणे जाणे सुरू केले.

त्याने महिलेला लग्नाचे वचन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला त्याच्या घरी गेली, जिथे त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. जेव्हा महिला लग्नासाठी दबाव टाकू लागली. तेव्हा आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.

पीडित महिलेने तक्रारीत धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी केवळ तिचेच शोषण करत नव्हता, तर त्याची नजर तिच्या तरुण मुलीवरही होती. मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो महिलेला धमकावत होता. महिलेने याला विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय आरोपीचे इतर महिलांशीही अवैध संबंध असल्याचे समोर आले आहे. मोतीनगर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी रविकांत शर्मा याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी देणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार आमच्यावर अन्याय करतंय, जरांगे उपोषण करण्यावर ठाम

konkan : दाट जंगलात हरवलेला सागरी किल्ला, कोकणातील 'हे' रहस्यमय ऐतिहासिक ठिकाण पाहिलात का?

Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Deepali Sayyad : प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन; नेमकं काय प्रकरण?

'Deool Band 2' Movie Box Office Collection 7 Days: 'देऊळ बंद 2' चित्रपटाची गाडी सुसाट, पहिल्याच आठवड्यात कमावले तब्बल 'इतके' कोटी रूपये

SCROLL FOR NEXT