Namibia News  Saam TV
देश विदेश

Namibia News: हत्ती, झेब्रासह जंगलातील 700 प्राणी खाणार नामीबियातील नागरिक; कारण काय?

Ruchika Jadhav

Historic Drought and Food Crisis in Nambia: नामीबिया सरकारने मोठी घोषणा केली आहे. येथील जंगलामध्ये असलेल्या हत्ती, घोडा, जेब्रा यांसह विविध जंगलातील प्राणी मारून त्यांचे मांस नागरिकांना खणयसाठी द्यावेत अशी घोषणा केली आहे. नामीबिया सरकारचा हा निर्णय खरोखर डोकं चक्रवणारा आहे. आता सरकारने असा निर्णय नेमका का घेतला असेल असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. त्यामुळे आज याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

कारण काय?

नामीबिया सरकारने गेल्या आठवड्यात ही घोषणा केली आहे. 723 जंगली प्राण्यांना मारून त्यांचे मांस नागरिकांना खाण्यासाठी दिले जात आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे येथील नागरिकांवर आलेली उपासमारीची वेळ. नामीबियामध्ये मोठा दुष्काळ पडला आहे. दुष्काळ असल्याने येथील नागरिकांना खाण्यापिण्याची कोणतीही सोय उरलेली नाही. उपासमारीने येथे अनेकांचा मृत्यू होत आहे. नागरिकांचे हे हाल पाहता सरकारने येथील प्राण्यांची कत्तल करून हे मांस खाण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून या प्राण्यांना मारण्याचे आदेश

हिप्पो - 30

म्हैस - 60

ब्लू वाइल्डबीस्ट - 100

झेब्रा - 300

हत्ती - 83

हरणे - 100

आतापर्यंत किती प्राणी मारले

आतापर्यंत 157 प्राण्यांना मारून त्यांना खाण्यात आले आहे. तर 57,875 किलो मांस दुष्काळ असलेल्या ठिकाणी वाटण्यात आले आहे.

100 वर्षांतील भयंकर दुष्काळ

नामिबिया एक आफ्रिकन देश आहे. त्यामुळे येथे दुष्काळ पडणे ही काही नवीन गोष्ट नाही. येथे नेहमीच दुष्काळ पसरलेला असतो. मात्र या वर्षी येथील दुष्काळ फार जास्त आहे. पाऊस न पडल्याने येथील नागरिकांना खाण्यासाठी काहीच अन्न पिकवता आलेलं नाही.

पाऊस किती बरसला?

नामिबियासह दक्षिण आफ्रिकामध्ये भयंकर दुष्काळ पसरला आहे. येथे फेब्रुवारीमध्ये जास्त पाऊस पडतो. मात्र या वर्षी येथे 20 टक्के सुद्धा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथे शेती होऊ शकली नाही. तसेच पाण्याचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. एकंदर परिस्थिती पाहता येथील राष्ट्रपतींनी 22 मे 2024 रोजी एमर्जन्सीची घोषणा केली.

प्राणी भूक भागवणार की आयुष्य संपवणार?

नामीबियातील नागरिक सध्या फक्त मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र फक्त जंगलातील प्राण्यांचे मांस खाणे नागरिकांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे की धोक्याचे याबद्दल MD(Hom), PGDEMS डॉक्टर कोमल जितेश जाधव यांनी माहिती दिली आहे.

दुष्काळ काळात व्यक्तीच्या शरीराला लोह, प्रथिने, कॅल्शिअम अशा अनेक जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. प्राण्यांच्या मांसामध्ये झिंकचे प्रमाण सुद्धा जास्त असते तसेच अन्य जीवनसत्त्व देखील जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते.
डॉक्टर कोमल जाधव

मांस खाण्याचे तोटे

मांसाहार करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असले तरी त्याचे काही तोटे देखील आहेत. जंगलात फिरणाऱ्या वन्य प्राण्यांना काही आजार असल्यास त्याचे सेवन केल्याने ते विषाणू आपल्यामध्ये देखील शिरकाव करतात. त्यामुळे संसर्ग वाढून आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. जास्त मांस खाल्ल्याने वजन वाढणे, पचनक्रिया बिघडणे तसेच रक्तदाबाच्या समस्या उद्भवण्याचा त्रास होऊ शकतो, असं डॉ. कोमल जाधव म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT