Zoo Animals : मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांचा का होतोय मृत्यू? वेगवेगळी कारणं आली समोर

Veer mata Jijabai Bhosle Zoo : वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहेत.
Zoo Animals : मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांचा का होतोय मृत्यू? वेगवेगळी कारणं आली समोर
Published On

Animals Died In Veermata Jijabai Bhosle Botanical Garden and Zoo :

मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांचा मृत्यू होत असल्याने महानगरपालिका प्रशासन चिंतेत पडले आहे. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात कुठल्याही प्रकारचे आजारपाणाची लक्षणे नसतानाही प्राण्याचा मृत्यू होत आहे. यामुळे प्रशासन चिंतेत पडले आहे. (Latest News)

प्राण्यांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे प्रशासन सतर्क होत प्राण्याची नियमित तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणीत जे प्राणी-पक्षी आजारी आढळतात त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. उपचारादरम्यान प्राण्याचा मृत्यू झाला किंवा कुठल्याही प्रकारची आजारपाणाची लक्षणे नसतानाही अचानक मृत्यू झाला तर संबंधित प्राणी-पक्ष्याचे शवविच्छेदन करणे अनिवार्य झालं आहे.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

दरम्यान प्राणिसंग्रहालयातील बहुसंख्य प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू हा अंतर्गत अवयव निकामी होणे,अस्तित्व राखण्यासाठी दोन प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये झालेल्या झटापटी, वृद्धापकाळ आदी कारणांमुळे मृत्यू होत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात विविध प्रजातींच्या प्राणी व पक्ष्यांचा अधिवास आहे. प्राणिसंग्रहालयातील वन्यजिवांची त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. उपचारादरम्यान जर प्राण्याचा मृत्यू झाला किंवा कुठल्याही प्रकारची आजारपाणाची लक्षण नसताना अचानक मृत्यू झाल्यास प्राणिसंग्रहालय त्याचे शवविच्छेदन करते.

मृत्यू कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल तयार केला जातो. या प्राणिसंग्रहालयातील पशू, पक्ष्यांच्या मृत्यूदरात वाढ झाल्याच्या आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रकाशित झाल्यात. या अनुषंगाने सदर स्पष्टीकरण करण्यात येत आहे. प्राणी-पक्ष्यांचा शवविच्छेदनाचा अहवालात प्रथमदर्शनी हृदय, फुप्फुस, मेंदू, किडनी, यकृत इत्यादी अवयवांची तपासणी केली जाते. त्यावरून मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जातो. अनेकदा प्राण्यांचे अवयव निकामी होण्याची बाब समोर येते.

यामागे कारणे वेगवेगळी असतात. यात वृद्धापकाळ, प्राणी-पक्ष्यांमधली झटापटी, त्यातून होणाऱ्या जखमा, अतिरिक्त रक्तस्त्राव, फुप्फुस-यकृत-मूत्रपिंडाचा आजार, कर्करोग, गर्भाशयाचे आजार आणि ताण-तणाव अशा अनेक बाबींचा समावेश असतो. फुप्फुस निकामी होणे किंवा एकापेक्षा जास्त अवयव संसर्गामुळे किंवा वृद्धापकाळामुळे देखील निकामी होतात. समूहाने राहणाऱ्या प्राण्यांमध्ये (हरीण, पक्षी, माकड इत्यादी) वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकदा झटापटी होतात. त्यांना इजा होते. अस्तित्व राखण्यासाठी किंवा क्षीण, वयस्कर, आजारी असलेल्या प्राण्यांना समुहातून वेगळे करण्यासाठी प्राण्यांमध्ये झटापटी होतात आणि यातूनच जखमी होवून बऱ्याचदा प्राण्यांचा मृत्यू होत असतो.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरण प्रकल्पात सर्व प्राण्यांच्या प्रदर्शनी नवीन पद्धतीने तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन प्राण्यांची देवाण-घेवाण झाली नाही. सध्या संग्रहालयात हरीण, माकड, पक्षी हे प्राणी आहेत. यातील बऱ्याच पक्ष्यांचे व प्राण्यांचे आयुर्मान कमी झाले आहे. परिणामी या वयस्कर प्राणी-पक्ष्यांचा मृत्यूदर वाढलेला असल्याचे सांगितलं जात आहे. हरीण प्रजातीच्या नवीन प्रदर्शनी तयार झाल्या आहेत. या प्रदर्शनींमध्ये इतर प्राणिसंग्रहालयातून वेगवेगळ्या हरणांच्या प्रजाती आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Zoo Animals : मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांचा का होतोय मृत्यू? वेगवेगळी कारणं आली समोर
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; शहरात उद्या १५ टक्के पाणीकपात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com