Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; शहरात उद्या १५ टक्के पाणीकपात

Mumbai Water cut Today : मुंबईतील पाणी पुरवठ्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबई शहरात उद्या १९ मार्चला एका दिवसासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
Water Cut
Water CutSaam Tv
Published On

Mumbai Water Supply Update :

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील पाणी पुरवठ्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबई शहरात उद्या १९ मार्चला एका दिवसासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

मुंबईकरांना उद्या म्हणजे १९ मार्चला पाणी जपून वापरावे लागणार आहे. मुंबई शहरात उद्या दिवसभरासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. पिसे बंधाऱ्यातील एका रबरी ब्लाडरमध्ये झाला. यामुळे १६ मार्चला पाणीगळती सुरु झाली होती. रबरी ब्लाडरच्या दुरुस्तीसाठी पाणी पातळी भातसा धरणातून येणारा पुरवठा कमी करावा लागणार आहे.

आज १८ मार्चला ८ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत काम करून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, बंधाऱ्यातील पाण्याची पातळी पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.

उद्या म्हणजे १९ मार्चला एक दिवस संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Water Cut
IMD Rain Alert: विदर्भात गारपीठ, वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवस पडणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मुंबईत ४ एप्रिलपर्यंत ५ टक्के पाणीकपात

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने शहरात २४ एप्रिलपर्यंत ५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील मान्सून पूर्व कामासाठी ५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

भांडुप जलशुद्धीकरण केंद्र हे आशियातील सर्वात मोठं केंद्र आहे. या केंद्रातून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. भांडुपमध्ये दोन जलशुद्धीकरण केंद्रे आहे. एका केंद्रात ९१० दक्षलक्ष लिटर क्षमता आहे. तर दुसऱ्याची ९०० दशलक्ष लिटर क्षमता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com