Rahul Gandhi On Mimicry Row Saam Tv
देश विदेश

Mimicry Row: '150 खासदारांच्या निलंबनावर चर्चा का नाही?', उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवर राहुल गांधी म्हणाले...

Satish Kengar

Rahul Gandhi On Mimicry Row: 

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होत. ज्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. यावरच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''खासदार तिथे बसले होते, मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. मीडिया हे दाखवत आहे. कोणी काही बोलले नाही. आमच्या 150 खासदारांचं निलंबन केलं आहे, पण त्यावर मीडियात चर्चा होत नाही. अदानींवर चर्चा नाही, राफेलवर चर्चा नाही, बेरोजगारीवर चर्चा नाही. आमचे खासदार निराश होऊन बाहेर बसले आहेत. पण तुम्ही मिमिक्रीवर चर्चा करत आहात.''

संसदेत नुकत्याच झालेल्या सुरक्षा चुकीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात निवेदन मांडव अशी मागणी काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी केली आहे. यावरून विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेत गेल्या काही दिवसांपासून गदारोळ केला आहे. यातच फलक दाखवून सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी एकूण 143 खासदारांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलंबनाच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील खासदारांनी नंतर संसदेच्या संकुलात निदर्शने केली. ज्या दरम्यान टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री केली. यावेळी अनेक खासदार हसताना दिसले, तर राहुल गांधी मिमिक्री करतानाचा व्हिडिओ शूट करत होते, असा आरोप सत्तापक्षातील खासदारांनी केला. भाजपसह संपूर्ण एनडीएने उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीला आणि त्याच्या रेकॉर्डिंगला विरोध केला आहे.  (Latest Marathi News)

कल्याण बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात एका वकिलाने संसदेच्या संकुलात जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याचबाबत माहिती देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, "अधिवक्ता अभिषेक गौतम यांनी मंगळवारी संध्याकाळी डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आम्ही ही तक्रार नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे पाठवली आहे."

गौतम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा व्हिडिओ भारताचे उपराष्ट्रपती, त्यांची जात तसेच एक शेतकरी आणि वकील म्हणून त्यांची पार्श्वभूमी यांचा अपमान आणि बदनामी करण्याचा हेतूने शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे तृणमूल खासदार आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या योग्य कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT