Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update 
देश विदेश

AC Bus Fire : दिवाळीसाठी एसी बसने घरी निघाले अन् काळाने गाठलं, फटाक्याने घेतला २० जणांचा बळी, Inside Story

Jaisalmer AC Bus Fire News : दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने झडप घातली. जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एसी बसला आग लागून २० जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, एसी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत फटाक्यांचा स्फोट झाला.

Namdeo Kumbhar

Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update : जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एसी बसमध्ये लागलेल्या आगीने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. फोटो पाहून अनेकांची झोप उडाली. हसत-खेळत अन् आनंदात दिवाळीसाठी घरी जाणाऱ्यांवर अचानक काळाने झडप घातली. एसीबी बसला लागलेल्या आग्नितांडवात २० जणांचा मृत्यू झाला. तर १६ जण गंभीर भाजले गेलेत. ही आग लागली कशी? याचा तपास केला जातोय. फक्त ५ दिवस जुनी असणारी बस आगीच्या गोळ्यासारखी झाली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. लहान मुलं, महिला अन् वृद्धांचा जीव गेला. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त होतेय. (20 people die in Jaisalmer bus fire caused by crackers)

काहीजण दिवाळीसाठी घरी जात होते. तर काही नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. कुणाची पत्नी गेली, तर कुणाच्या डोक्यावर छत नाहीसे झाले. २० जणांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? असा सवाल मृताच्या नातेवाईकांकडून विचारला जातोय. आग इतकी भयानक होती की मृतदेहाची ओळख पटवणेही कठीण आहे. डीएनए चाचणीच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्यात येणार आहे. (20 dead in Jaisalmer AC sleeper bus fire latest update News )

घराकडे उत्साहात निघालेल्या प्रवाशांवर क्षणात काळाने घाला घातला. अचानक आग लागली अन् होत्याचे नव्हते झाले. आग इतकी भयंकर होती की एसी बसचा फक्त सांगडा राहिला. आग लागल्यानंतर प्रवाशांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्हाला वाचवा वाचवा.. असे म्हणत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. काही जणांनी तर जीव वाचवण्यासाठी बसच्या काचामधून उड्या मारल्या. या भयानक घटनेची दोन कारणं समोर आली आहेत.

नेमकी आग लागली कशामुळे? (Reason behind AC bus catching fire in Rajasthan)

जैसलमेरमध्ये खासगी एसी बस जळून खाक झाली. त्यात २० प्रवाशांचा मृत्यू झाला. ही आग कशामुळे लागली, या कारणाचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये शॉर्ट सर्किट मुळे (Short circuit in AC bus leads to deadly blaze in Rajasthan) आग लागली. त्यात काही प्रवाशांकडे दिवाळीचे फटाके होते. त्यामुळे आगीने क्षणात अक्राळ विक्राळ रूप घेतले.

प्राथमिक माहतीनुसार, जैसलमेरमधून बसलेल्या काही प्रवाशांकडे फटाक्यांचं सामान होतं. एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली अन् क्षणात बसमध्ये आग पसरली. आगीत फटाक्या आल्यानंतर ती अधिक तीव्र झाली. आग फटाक्यांमुळे संपूर्ण एसी बसमध्ये पसरल्याचं सांगितलं जात आहे. एसी बसमधून फटाके नेण्याची परवानगी नाही, तरीही घेऊन कसे जात होते, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. राजस्थानचे मंत्री गजेंद्र सिंह खिमसर म्हणाले, "मी माझ्या आयुष्यात असा अपघात कधीच पाहिला नाही. बसमध्ये स्फोट झाल्याचे समोर आलेय. याबाबत FSL टीम चौकशी करेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: भाजप वॉर्ड अध्यक्षाचेच नाव तीन वेगवेगळ्या एपिक नंबरवर, मनसेचा गंभीर आरोप

धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

Labh Drishti Yog 2025: 18 नोव्हेंबरपासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बँक बॅलन्स डबल होऊन सर्व स्वप्नही होणार पूर्ण

Shocking: धक्कादायक! मित्रच बनला वैरी; २५ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT