Bullet Train Project  Saam Tv
देश विदेश

Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पात 'नॉईज बॅरिअर्स'चा वापर, नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

Bullet Train Project Noise Barriers : बुलेट ट्रेन प्रकल्पात ध्वनी अडथळे बसवले जात आहेत. हे ध्वनी अडथळे का बसवले जात आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी आहे. या प्रकल्पात ध्वनी अडथळे (noise barriers) बसवण्यात येत असल्याची माहिती मिळतेय. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची देखरेख करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मंगळवारी याबद्दल माहिती दिलीय. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर ध्वनी अडथळे बसवण्याचे काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे ध्वनी अडथळे का बसवले जात आहेत? असा प्रश्न सर्वांना पडतोय.

हे ध्वनी अडथळे गाड्या आणि नागरी संरचनांद्वारे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी बसवले जात आहेत. NHSRCL ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, १० सप्टेंबरपर्यंत गुजरातमध्ये ८७.५ किमी परिसरात ध्वनी अडथळे बसवण्यात आले (Bullet Train Project) आहेत. पावणे दोन लाखांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. एनएचएसआरसीएलच्या म्हणण्यानुसार, १ किमीच्या क्षेत्रासाठी व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला सुमारे दोन हजार ध्वनी अडथळे बसवण्यात आले आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पात 'नॉईज बॅरिअर्स'

एक किलोमीटरच्या परिसरात व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला २ हजार ध्वनी अवरोधक बसवण्यात आलेत. या मॉड्युलर घटकासाठी तीन प्रीकास्ट कारखाने सुरत, आनंद आणि अहमदाबादमध्ये ध्वनी अडथळे निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आले (Indian Railway) होते, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ध्वनी अडथळे रेल्वे पातळीपासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीट पॅनेल आहेत. प्रत्येक ध्वनी अडथळ्याचे वजन अंदाजे ८३० ते ८४० किलो असते.

एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये तयार होणारा एरोडायनॅमिक आवाज आणि ट्रेनच्या अंडर कॅरेज, मुख्यतः ट्रॅकवर चालणाऱ्या चाकांमुळे निर्माण होणारा आवाज वितरीत करण्याचं काम हे अडथळे (Bullet Train Project Noise Barriers) करतील. प्रवाशांना प्रवासात त्रास होवू नये, प्रवासाचा आनंद लुटता यावा म्हणून हे ध्वनी अडथळे बसवले जात आहेत. निवासी आणि शहरी भागातून जाणाऱ्या मार्गांवर ३ मीटर उंच ध्वनी अडथळे असतील.

कसा आहे प्रकल्प?

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ३१ जुलै रोजी लोकसभेत माहिती दिली होती की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पासाठी १३८९.५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलीय. आतापर्यंत ३५० किलोमीटर पिअर फाउंडेशन, ३१६ किलोमीटर पिअर बांधकाम, २२१ किलोमीटर गर्डर टाकण्याचे आणि १९० किलोमीटर गर्डर लॉन्चिंगचे काम पूर्ण झालंय. २१ किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचं काम देखील सुरू झालंय.

बुलेट ट्रेन हाय-स्पीड रेल्वे आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अगदी कमीत कमी वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे नोकरीची मोठी संधी देखील उपलब्ध झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT