NEET protest, CRPF, Pellet gun controversy साम टीव्ही
देश विदेश

नीट आंदोलकांवर पेलेट गन कोणी चालवायला सांगितली? अखेर सीआरपीएफने सांगितलं नाव, पाहा काय म्हणाले...

NEET protest, CRPF, Pellet gun controversy : नीट आंदोलनादरम्यान पेलेट गन वापरण्याच्या प्रकरणात सीआरपीएफने मोठा खुलासा केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर आणि सर्व मानक कार्यपद्धतींचे (SOP) पालन करूनच कारवाई करण्यात आल्याचा दावा सीआरपीएफने केला आहे.

Namdeo Kumbhar

CRPF review on NEET protest pellet gun use : 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर केल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी राजकीय वातावरणही तापले असतानाच आता केंद्रीय राखीव पोलीस बलाने (CRPF) आपल्या (Review) अहवालात मोठा खुलासा केला आहे.

आंदोलकांवर करण्यात आलेला पेलेट गनचा वापर पूर्णपणे नियमानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनेच करण्यात आल्याचा दावा सीआरपीएफने केला आहे. सर्व मानक कार्यपद्धतींचे (SOPs) तंतोतंत पालन करण्यात आल्याचे स्पष्ट करत सैन्याने या कारवाईचे समर्थन केले आहे. या अहवालामुळे आता या वादाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.

सीआरपीएफच्या सूत्रांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला (TOI) दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दंगलविरोधी पथक असलेल्या 'रॅपिड ॲक्शन फोर्स'ने (RAF) केलेल्या कारवाईची सखोल तपासणी केली असता, परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्यानेच बळाचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरुवातीला ध्वनिवर्धकावरून सूचना देणे, अश्रुधुराचा वापर करणे आणि लाठीचार्ज यांसारखे सौम्य उपाय करण्यात आले.

मात्र, हे उपाय जमावाला नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्यानंतरच शेवटचा पर्याय म्हणून 'पंप ॲक्शन गन'चा (पेलेट गन) वापर करण्यात आला. या कारवाईत धातूच्या गोळ्या लागून सुमारे ३ ते ५ आंदोलक जखमी झाले. तसेच आंदोलकांच्या हल्ल्यात RAF चे ४७ जवान जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

कारवाईदरम्यान पेलेट गनच्या धातूच्या गोळ्या लागल्याने सुमारे ३ ते ५ आंदोलक जखमी झाले. तर आंदोलकांच्या हल्ल्यात रॅपिड ॲक्शन फोर्सचे (RAF) ४७ जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (न्यायप्रविष्ट) आहे. त्यामुळे जवानांच्या या कारवाईबाबतचा संपूर्ण अहवाल आणि दलाची बाजू थेट सर्वोच्च न्यायालयातच मांडली जाईल. आरएएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी करण्यात आलेला बळाचा वापर हा दिल्ली पोलिसांच्या पूर्वपरवानगीने, ठरवून दिलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात आला होता.

सुरक्षा दलांवर दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला

सूत्रांनुसार, आंदोलकांच्या जमावात काही उपद्रवी आणि चिथावणीखोर तत्वे शिरली होती. या लोकांनी दिल्ली पोलीस आणि आरएएफच्या जवानांवर तुफान दगडफेक केली, तसेच काही ठिकाणी लोखंडी रेलिंगनेही हल्ला चढवला. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (BNSS), एखादा बेकायदेशीर जमाव पांगवण्यासाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच नागरी बळाचा वापर केला जाऊ शकतो. दिल्लीत हे दंडाधिकारी अधिकार दिल्ली पोलीस आयुक्तांकडे आहेत. आयुक्तांनी हे अधिकार साहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) स्तरावरील अधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT