Pune : इन्स्टाग्रामवरील 'सिया'च्या जाळ्यात अडकला पोलीस पाटील, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६ लाखांना गंडवले

Instagram scam : पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाची इन्स्टाग्रामवरील जाहिरात आणि ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडून ₹५६.२५ लाखांची फसवणूक झाली. पौड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Instagram share trading scam in Pune
Instagram share trading scam in PuneSaam
Published On

Instagram share trading scam in Pune : पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणात, त्याच्या होणाऱ्या पत्नीने त्याला किल्ले लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिची चर्चा राज्यभरात झाली. सध्या सिया गोयल न्यायालयीन कोठडीत असली, तरीही याच नावाच्या आणखी एका कथित "सिया"चा कारनामा समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून, "सिया" नावाच्या तरुणीने ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाची सोशल मीडियावरील एका जाहिरातीला भुलून ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी मुळशी तालुक्यात कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित पोलीस पाटलांनी टप्प्याटप्प्याने ५६ लाखांची गुंतवणूक केली; मात्र त्यांना एक रुपयाही परत काढता आला नाही.

हा प्रकार स्वतःचे नाव "सिया" सांगणाऱ्या एका महिलेसह तिच्या अन्य साथीदारांनी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिया नावाच्या महिलेसह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Instagram share trading scam in Pune
सोसायटीत तुमचा फ्लॅट आहे? मग राज्य सरकारच्या नव्या नियमांबद्दल माहिती असायलाच हवी; ६ महत्त्वाचे बदल वाचाच

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या या फसवणुकीची जाणीव तक्रारदारांना तीन महिन्यांनंतर झाली, जेव्हा त्यांनी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरील एका जाहिरातीपासून झाली. ही जाहिरात एका प्रसिद्ध ब्रोकरेज कंपनीची असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. त्या जाहिरातीवर क्लिक करताच तक्रारदाराला व्हॉट्सॲपवरील गुंतवणुकीशी निगडित एका ग्रुपमध्ये जोडले गेले.

Instagram share trading scam in Pune
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT चौकशी; महाराष्ट्रासह ८ राज्यांना झटका

पोलीस पाटलाशी "सिया"ने साधला संपर्क

ग्रुपमध्ये सहभागी केल्यानंतर तक्रारदाराशी "सिया" नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने त्यांना काही तांत्रिक गोष्टी सांगून मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग ॲप इंस्टॉल करायला लावले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी ॲपमध्ये सुरुवातीला बनावट नफा दाखवण्यात आला. तसेच सवलतीच्या दरात IPO (आयपीओ) शेअर्स मिळतील, असे आमिषही दाखवले गेले.

तक्रारदाराने जसजशी अधिक रक्कम गुंतवली, तसतसे त्या ॲपवरील डॅशबोर्डवर त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य वाढत असल्याचे दिसू लागले. अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे ॲपमध्ये दर्शवण्यात आले.

Instagram share trading scam in Pune
BJP Maharashtra : भाजपाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, दिग्गज महिला नेत्याला जातिवाचक शिवीगाळ, राज्यात खळबळ

मोठी रक्कम जमा झाल्याचे पाहून तक्रारदाराने पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. उलट, आरोपींनी जमा झालेली रक्कम खात्यातून काढण्यासाठी (विड्रॉ करण्यासाठी) आणखी ३० लाख रुपये 'सिक्युरिटी डिपॉझिट' म्हणून भरण्याची मागणी केली. पैसे परत मिळत नसल्याने संतप्त तक्रारदाराने अधिक रक्कम भरण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे भरणार नाही असे सांगताच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला आणि गुंतवलेली मुळ रक्कमही परत दिली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पौड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com