गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Nagpur Police ASI Ravindra Kokande Death After Ganpati Immersion Duty: गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताची ड्युटी पूर्ण करून घरी परतल्यानंतर नागपूर पोलिस दलातील एएसआय रवींद्र महादेवराव कोकांडे यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
NAGPUR POLICE ASI RAVINDRA KOKANDE DIES AFTER GANPATI VISARJAN DUT
NAGPUR POLICE ASI RAVINDRA KOKANDE DIES AFTER GANPATI VISARJAN DUTsaam tv
Published On: 

पराग ढोबळे, साम टीव्ही

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताची रात्रभर ड्युटी करून घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील एएसआयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र महादेवराव कोकांडे (वय 56) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (27 सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास कोकांडे यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी ते पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तैनात होते. ड्युटी पूर्ण करून घरी परतल्यानंतर त्यांना त्रास जाणवला.

NAGPUR POLICE ASI RAVINDRA KOKANDE DIES AFTER GANPATI VISARJAN DUT
शेअर मार्केटच्या नुकसानीने डोकं फिरलं; चोरीसाठी घरात घुसला अन् 61 वर्षीय वृद्धासोबत भयंकर घडलं

त्यानंतर त्यांचा मुलगा ऋषभ याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना धंतोलीतील रुग्णालयातून मेडिकल हॉस्पिटलकडे हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रवींद्र कोकांडे हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शीला आणि दोन मुले ऋषभ (२७) व रोहित (२५) असा परिवार आहे.

NAGPUR POLICE ASI RAVINDRA KOKANDE DIES AFTER GANPATI VISARJAN DUT
क्रूरतेची सीमा ओलांडली! राजधानीत अल्पवयीन मुलांनी रचला भयंकर कट; तरुणीसोबत नको ते केलं अन्...

या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्यावर कपिलनगर घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून शोकसलामी देत एएसआय रवींद्र कोकांडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com