Monkeypox Saam Tv
देश विदेश

मंकीपॉक्स प्रकरणी WHO ची मोठी घोषणा! मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

मंकीपॉक्सची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - गेल्या दोन वर्षांत जगभरातील बहुतेक देशांमध्ये, कोरोनाव्हायरस संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अनेक देश अजूनही या विषाणूपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, त्यात्याच आता मंकीपॉक्सच्या (Monkeypox) वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनानंतर मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. यासोबतच WHO ने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ WHO आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून पाहत आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जास्त आहेत. त्यातच भारतातही तीन रुग्ण आढळले आहे.

हे देखील पाहा -

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाच देशांमध्ये सर्वाधिक पसरला आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक 3125 लोक आहेत. यानंतर अमेरिकेत 2890, जर्मनीमध्ये 2268, ब्रिटनमध्ये 2208 आणि फ्रान्समध्ये 1567 रुग्ण आढळले आहेत.

१४ जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

देशात १४ जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. तो रुग्ण युएईतून परतला होता. त्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा व्हायरस आहे. जगभरात आतापर्यंत ६३ देशांमध्ये मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे :

मंकीपॉक्सची सामान्यत: लक्षणे ताप येणे,पुरळ आणि मोठ्या प्रमाणात गाठी (lymph node)येणे ही आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतात.

पुरळ पोट किंवा पाठी ऐवजी चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. पुरळ मोठयाप्रमाणात चेहरा ( ९५% ), हाताचे तळवे आणि पायांचे तळवे (७५%), तोंडातील व्रण (७०%) , जननेंद्रिय (३०%) आणि डोळे (२०%) दिसते.

मंकीपॉक्स हा सामान्यतः स्वयं-मर्यादित आजार आहे. ज्याची लक्षणे 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते.मृत्यू दर 1-10% पर्यंत असू शकतो.

लहान मुलांमध्ये या आजारची लक्षणं जास्त तीव्र आढळून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Breast cancer: शरीरात ही 8 लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो

SCROLL FOR NEXT