Who is Vivek Bindra ANI
देश विदेश

Vivek Bindra: पत्नीला मारहाण करण्याच्या आरोपात अडकलेले विवेक बिंद्रा आहेत तरी कोण? किती आहे त्यांची संपत्ती?

Who is Vivek Bindra : विवेक बिंद्रा हे देशातील सर्वात परिचीत नाव आहे. विवेक बिंद्रा हे प्रसिद्ध इंटरनॅशनल मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. बिंद्रा हे बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापकदेखील आहेत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Bharat Jadhav

Who is Vivek Bindra :

प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या पत्नीने विवेक बिंद्रा यांच्यावर मारहाणीचे केल्याचे आरोप केलाय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान विवेक बिंद्रा हे दुसऱ्यांदा वादात अडकलेत. याआधी मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात झालेल्या वादामुळे ते चर्चेत आले होते. विवेक बिंद्रा हे लोकांकडून पैसा उकाळतात असा आरोप संदीप माहेश्वरी यांनी केला होता. (Latest News)

दरम्यान यावेळी विवेक बिंद्रा यांच्यावर त्यांच्या पत्नीने मारहाण केल्याचा आरोप केलाय. गौतम बुद्ध नगर सेक्टर १२६ पोलीस ठाण्यात विवेक बिंद्रा यांच्या विरुद्धात तक्रार नोंदवण्यात आलीय. विवेक बिंद्रा यांचे लग्न ६ डिसेंबर रोजी झालं होतं. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी त्यांच्याविरुद्धात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यात आलीय. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी विवेक बिंद्रा यांनी पत्नीला मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे विवेक बिंद्रा

विवेक बिंद्रा हे परिचीत नाव आहे. बिंद्रा हे एक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. यासह ते बडा बिझनेसच प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. बिझनेस कसा चालवावा. आपल्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी, या टीप्स विवेक लोकांना देतात. त्यांचे शो आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले आहेत. जे लोक व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असतात ते विवेक बिंद्रा यांचे व्हिडिओ पाहतात. युट्यूबवर विवेक बिंद्रा हे खूप लोकप्रिय आहेत. युट्यूबवर त्यांना २१.४ मिलियन सब्सक्रायबर्स आहेत.

किती आहे संपत्ती

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांचं दिल्लीत एक वातानुकूलीत असं घर आहे. नोएडामध्ये देखील त्यांची संपत्ती आहे. विवेक बिंद्रा हे आल्या शोच्या व्हिडिओमध्ये खूप चांगली कमाई करतात. बिंद्रा यांची एकूण संपत्ती १ मिलियन डॉलरच्या आसपास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्रा हे एका महिन्याला ४० ते ५० लाख रुपयांची कमाई करतात. या हिशोबाने ते दरवर्षाला ७ ते ९ कोटी रुपयांची कमाई करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT