Padamshri Award Return: पुरस्कार परत करण्याचा असतो का अधिकार? देण्याआधी विचारली जाते इच्छा, काय आहेत पुरस्कारांचे नियम?

Awards Rules: कोणताही पुरस्कार विजेता कारण सांगून आपला पुरस्कार परत करू शकतो. परंतु पद्म पुरस्कारासंदर्भात अशी कोणतीच तरतूद नाहीये. जेव्हा कोणत्या व्यक्तीला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, तेव्हा त्याचे नाव भारताच्या गॅझेटमध्ये प्रकाशित केलं जातं.
Awards Rules
Awards RulesStudy wrap
Published On

Padmashri Awards Rules :

महिला पैलवानांच्या मुद्द्यावरून बजरंग पुनियाने (Bajrang Punia) मोठा निर्णय घेत त्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार(Padma Shri Award Return) परत केलाय. पुरस्कार परत करणारा पुनिया हा पहिला व्यक्ती नाहीये. याआधी अनेकांनी पुरस्कार परत केले आहेत. परंतु पुरस्कार परत करण्याचा अधिकार पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला असतो का? पुरस्कार परत केल्याने देशाचा अपमान होता का? अशी प्रश्न अनेकांना पडली आहेत, याची उत्तरं आपण जाणून घेऊ.. (Latest News)

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार,कोणताही व्यक्ती कारण सांगून त्याला मिळालेला पुरस्कार परत करू शकतो. परंतु पद्म पुरस्कारसंदर्भात अशी कोणतीच तरतूद नाहीये. जोपर्यंत ठोस कारण सांगण्यात येत नाही, तोपर्यंत पद्म पुरस्कार (Padma Award) परत करता येत नाही. जेव्हा राष्ट्रपती (President) पुरस्कार विजेत्याचं नाव परत घ्या, असं सांगितलं जातं. त्यावेळी पुरस्कार परत करता येतो. त्यावेळी पुरस्कार कशाप्रकारे पुरस्कार रद्द केलं जातं, हे जाणून घेऊ..

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१८ तत्कालीन गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत (Rajyasabha) पुरस्कार परत करण्याविषयीचा नियम सांगितला होता. कोणत्याही व्यक्तीला पुरस्कार देताना तपास यंत्रणेकडून त्याची चौकशी केली जाते. त्याचं वर्तन तपासले जाते. चारित्र्याची पडताळणी केल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारांसाठी त्या व्यक्तीचं नामांकन केलं जातं.

त्या व्यक्तीने नाव जाहीर करण्याआधी त्याला त्याची इच्छा विचारली जाते. ते हा पुरस्कार घेण्यास तयार आहेत का अशी इच्छा विचारली जाते. दरम्यान हे अनौपचारिक पद्धतीने केलं जातं. परंतु जर पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला जेव्हा पुरस्कार घेण्यास नकार दिला तर त्याचं नाव जाहीर केलं जातं नाही.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पद्म विभूषण, पद्म भूषण किंवा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. त्यावेळी त्याचं नाव गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात येतं. पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या नावांची एक नोंदणी केली जाते. पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला व्यक्ती पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला तर त्या व्यक्तीचे नाव त्या नोंदणीतून हटवलं जाते.

Awards Rules
Bajrang Punia: पंतप्रधान मोदींची भेट नाही, कुस्तीपटू बजरंग पुनियाने निवासस्थानाबाहेर ठेवला 'पद्मश्री'; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com