UK Election Results2024:  Saamtv
देश विदेश

Who Is Keir Starmer: ब्रिटनमध्ये ४०० पार! ऋषी सुनक यांना धोबीपछाड; कोण आहेत नवे पंतप्रधान कीर स्टार्मर?

UK Election Results 2024: त्यामुळे तब्बल १४ वर्षानंतर ब्रिटनमध्ये सत्ताबदल होणार असून किम स्टारमर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधानपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कोण आहेत कीर स्टारमर? वाचा सविस्तर

Gangappa Pujari

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव झाला असून किम स्टारमर यांच्या नेतृत्वाखालील लेबर पक्षाने बहुमत मिळवले आहे. लेबर पार्टीला 650 पैकी 410 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे कीर स्टारमर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधानपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे तब्बल १४ वर्षानंतर ब्रिटनमध्ये सत्ताबदल होणार आहे.

कोण आहेत कीर स्टार्मर?

कीर स्टारमर जन्म 2 सप्टेंबर 1962 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे बालपण ऑक्स्टेड, सरे येथे गेले. केयरचा जन्म कामगार कुटुंबात झाला. त्याची आई एक परिचारिका होती तर केयरचे वडील टूलमेकर होते. स्टारमर यांनी रीगेट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि विद्यापीठात जाणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. केयर यांनी लीड्स विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले.

कीर स्टारमर यांना दोन मुले आहेत तर त्यांची पत्नी व्हिटोरिया ही राष्ट्रीय आरोग्य सेवेत कर्मचारी आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते मानवाधिकार वकील होते. 1987 मध्ये त्यांनी बॅरिस्टर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. कीर स्टारमरच्या आधी मजूर पक्षाचे नेते असलेले जेरेमी कॉर्बिन यांची काश्मीरबाबत भारतविरोधी भूमिका घेतली होती.

मात्र, कीर स्टारमर यांनी ब्रिटनमधील भारतीयांशी संबंध दृढ करण्याकडे महत्त्व दिले आहे. गेल्या वर्षी आपल्या भाषणात त्यांनी भारताशी जागतिक, पर्यावरण आणि आर्थिक सुरक्षा या आघाड्यांवर मजबूत संबंधांवर भर दिला होता. Keir Starmer यांच्या 2024 च्या निवडणूक जाहीरनाम्यात देखील भारतासोबतच्या संबंधांवर भर देण्यात आला आहे. हे सुरक्षा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या विषयांवर सखोल सहकार्याबद्दल बोलते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी लंडनमधील किंग्सबरी येथील श्री स्वामीनारायण मंदिरालाही भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT