Modi-shah-nadda Saam TV
देश विदेश

Assembly Election 2023 : तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठांमध्ये खल सुरू, मध्य प्रदेशातील एक नाव जवळपास निश्चित!

CM Candidates for Madhya Pradesh, rajasthan and chhattisgarh : मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्याच नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब होऊ शकते.

प्रविण वाकचौरे

Assembly Election News Update :

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या दणदणीत विजयानंतर या राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगू लागली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय जनता पक्षाने या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित केल्याचे सूत्रांकडून समजते. काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाजपने अद्याप ही नावे उघड केलेली नाहीत. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्याच नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब होऊ शकते. दोन उपमुख्यमंत्री होण्यावर मात्र अद्याप चर्चा नाही. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे आघाडीवर आहेत.

वसुंधरा राजे यांच्याशिवाय ओम माथूर, ओम बिर्ला, अर्जुनराम मेघवाल, महंत बालकनाथ यांचीही नावे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारत आहेत. तर छत्तीसगडमध्ये गोमती साईंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. साई यांच्या सोबतच प्रदेशाध्यक्ष अरुण साव, ओपी चौधरी आणि विष्णू देव साई यांचीही नावे चर्चेत आहे.

तिन्ही राज्यांमधील भाजपची कामगिरी

मध्य प्रदेशात 163, राजस्थानमध्ये 115 आणि छत्तीसगडमध्ये 54 जागा जिंकून भाजपने इतिहास रचला आहे. तर तिन्ही राज्यात काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT