Election Results 2023: 'एक्झिट पोल'चे अंदाज सपशेल चुकले; सर्व्हेत काँग्रेसला दाखवले विजयाचे स्वप्ने, पण...

Exit Poll Results Faill: मध्य प्रदेश,राजस्थानमध्ये भाजप काठावर पास होणार तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असे म्हटले होते. मात्र, तेलंगणा वगळता ३ राज्यांमध्ये 'एक्झिट पोल'चे अंदाज फेल ठरले आहे.
Election Results 2023
Election Results 2023Saam tv
Published On

Election Results 2023:

देशातील पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच विधानसभा निवडणुकीत ३ राज्यात भाजपने यश मिळवलं आहे. पण 'एक्झिट पोल'चे अंदाजानुसार, मध्य प्रदेश,राजस्थानमध्ये भाजप काठावर पास होणार तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असे म्हटले होते. मात्र, तेलंगणा वगळता ३ राज्यांमध्ये 'एक्झिट पोल'चे अंदाज फेल ठरले आहे. यानंतर 'एक्झिट पोल'च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेश

मीडिया वृत्तानुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजपला सरासरी १०० ते ११५ जागा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचबरोबर काँग्रेसलाही त्याचप्रमाणे जागा मिळतील, अशी शक्यता ' 'एक्झिट पोल'मध्ये वर्तविली होती. तसेच 'ॲक्सिस माय इंडिया' आणि 'टुडेज चाणक्य'ने भाजपला १४० ते १६३ जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, भाजपने विधानसभा निवडणुकीत १६३ जागा जिंकून 'एक्झिट पोल'चे अंदाज फेल ठरवले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Election Results 2023
Ajit pawar vs Sharad Pawar : कोणाचं प्रतिज्ञापत्र खरं? सुनावणीत प्रतिज्ञापत्रांवरून दोन्ही गटात घमासान

राजस्थान

भाजप आणि काँग्रेसला सरासरी ९० ते ११० जागा मिळण्याची अंदाज 'एक्झिट पोल'मध्ये वर्तविण्यात आला होता. 'जन की बात', 'मॅट्रिझ' आणि 'ईटीजी' यांच्या 'एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला होता. त्यांनी भाजपला १०० ते ११८ सरासरी जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपने ११५ जागा जिंकल्या.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला एका 'एक्झिट पोल'चा अंदाज सोडला तर सर्वच 'पोल'ने ४५ ते ५० जागा जिंकतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, ‘जन की बात’ने भाजपला ४२ ते ५३ जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात भाजपने ५४ जागा जिंकल्या.

Election Results 2023
Nana Patole: शिंदे सरकारचं नागपूरमधील हे शेवटचं अधिवेशन; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

तेलंगणा

तेलंगणामध्ये एक 'एक्झिट पोल' साडून बाकी सर्वच पोलमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याचं म्हटलं होतं. पाेलट्रॅटने काँग्रेस आणि बीआरएसला ४७ ते ५७ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात तेलंगणात काँग्रेसला ६४ जागा मिळाल्या. मात्र, बीआरएसचे सरकार जाणार असल्याचा ' एक्झिट पोल' खरा ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com