vladimir putin  Saam Tv
देश विदेश

Russia Wagner Group: वॅगनर सैन्याच्या बंडानंतर रशिया शांत का? पुतीन नेमके कुठे आहेत?

वॅगनर सैन्याच्या बंडानंतर रशिया शांत का? पुतीन नेमके कुठे आहेत?

Satish Kengar

Russia-Ukraine War Update: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या वॅगनर गटाच्या बंडखोरीच्या समाप्तीनंतर रशियात भयावह शांतता पसरली आहे. रशियाविरुद्ध बंडाचे नेतृत्व करणारी व्यक्ती आता काहीशी नमलेली आणि शांत झाल्याचं दिसत आहे.

अशातच बंडखोरी करणारे हे देशद्रोही आहेत. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटल्यानंतर पुतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाही. ते नेमके कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

वॅगनर गटाचं बंड कसं संपवलं?

वॅगनर गटाचे सैनिक त्यांचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोच्या दिशेने वेगाने पुढे जात होते, परंतु अचानक त्यांनी हल्ला करणे थांबवले आणि युक्रेनमध्ये परतले. हे सर्व कसे घडले?  (Latest Marathi News)

वॅगनर गटाच्या लढाऊ सैनिकांच्या माघारामुळे अमेरिका आणि युरोपलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी रविवारी सीबीएसच्या फेस द नेशनवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वॅगनर गटाचे बंड पुतिन यांच्या अधिकाराला थेट आव्हान आहे. ते नेमके कुठे जाणार आहे, हे सांगता येत नाही.

चीनने रशियाशी केली चर्चा

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी रविवारी बीजिंगमध्ये रशियाचे उप परराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांच्याशी समान हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. चीनचे उप परराष्ट्र मंत्री मा झाओक्सू यांनी रविवारी रुडेन्को यांची भेट घेतली आणि गंभीर आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर दोन्ही देशांच्या समान हितांचे रक्षण करण्याचे वचन दिले.

चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने माजी संपादक इन चीफ हू झिजिन यांचा एक लेख प्रकाशित केला, ज्यात शासन बदलासह संभाव्य परिस्थितींचे विश्लेषण करण्यात आले आहे. देशातील परिस्थिती स्थिर करण्यासाठी रशियन नेतृत्वाच्या प्रयत्नांना चीनने पाठिंबा दर्शविला, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT