What's app new feature Saam TV
देश विदेश

दुसऱ्याचे डिलीट मेसेजेस कसे वाचू शकता? WhatsApp च्या भन्नाट फिचरबद्दल जाणून घ्या सविस्तर

नरेश शेंडे

दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या व्हाट्स अॅपमध्ये नवनवीन फिचर्स येत असतात. आताही व्हाट्स अॅपमध्ये अत्यंत महत्वाच्या भाग असलेल्या चॅटिंगबद्दल एक नवं फिचर आलं आहे. युजर्सने काही वेळापूर्वी डिलीट केलेल्या मेसेजबाबत (WhatsApp delete messages) माहिती देणारा हा फिचर असणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेल्या मेसेजला डिलीट करू शकता. मात्र, या फिचरमध्ये एक जबरदस्त खासीयत असणार आहे. तुम्ही डिलीट केलेला मेसेज पुन्हा रिकव्हर करण्याची सुविधा या (WhatsApp new feature) फिचरमध्ये असणार आहे. जाणून घेवूयात या फिचरबद्दल सविस्तर माहिती.

व्हाट्सअॅप युजरच्या एक्सपीरियन्सला चांगलं करण्यासाठी वेळोवेळी अपडेत घेत असतो. दिर्घकाळापासून लोकांना व्हाट्सअॅपच्या नव्या फिचर्सची प्रतिक्षा होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्हाट्सअॅपने युजर्ससाठी काही फिचर्स आणले आहेत. लोकांच्या वाढत्या मागणीनुसार व्हाट्सअॅप लवकरच एक भन्नाट फिचर घेवून येत आहे. हा फिचर व्हाट्सअॅपवर डिलीट केलेल्या मेसेजच्या रिकव्हरीबाबत असणार आहे. या व्हाट्सअॅप ट्रिकमुळं तुम्ही केलेल्या चुकांमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. या फिचरला व्हाट्सअॅपवर नजर ठेवणाऱ्या ट्रॅकिंग पोर्टल WABetaInfo ने स्पॉट केलं आहे.

'असं' काम करणार व्हाट्सअॅपचा नवा फिचर

व्हाट्सअॅपचा हा फिचर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या Undo फिचर सारखंच काम करणार आहे. WABetaInfo ने या फिचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. तुम्ही कुणाचा मेसेज डिलीट केला, तर तुम्हाला काही सेकंदांचा टाईम वेळ मिळणार आहे. याचदरम्यान जर तुम्हाला वाटत असेल हा मेसेज चुकून डिलीट झाला आहे, तर तुम्ही त्या मेसेजला Undo करू शकता. म्हणजेच डिलीट झालेल्या मेसेजला रिकव्हर करू शकता. WhatsApp चा हा फिचर अॅंड्राई़ड बीटा व्हर्जन २.२२.१८.१३ वर स्पॉट केला आहे. अॅंड्रॉईड आणि IOS स्टेबल यूजर्ससाठी केव्हापासून लाईव्ह असणार, याबाबत माहिती समोर आलेली नाहीय. दुसऱ्या यूजरच्या डिलीट केलेल्या मेसेजला तुम्ही तुमच्या फोनमध्ये रिकव्हर नाही करू शकत.

दुसऱ्याचे डिलीट मेसेजेस कसे वाचू शकता ?

दुसऱ्या युजरच्या डिलीट केलेल्या मेसेजला वाचण्याची एक सोपी पद्धत आहे. या ट्रीकच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेल्या मेसेजला पुन्हा वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन हिस्ट्री ऑन करावी लागेल. ज्यावेळी एखादा मेसेज तुमच्या फोनवर येईल, त्याचा नोटीफीकेशन तु्म्हाला मिळणार. जर एखाद्याने तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट केला, अशा स्थितीत मेसेज व्हाट्सअॅपवरून डिलीट होतो. पण तुम्ही त्या मेसेजला नोटीफीकेशन हिस्ट्री मध्ये जाऊन वाचू शकता. या फिचर्सला काही नियम आहेत. तुम्ही या फिचरच्या मदतीने फोटो, व्हिडिओ किंवा दुसऱ्या फाईलला अॅक्सेस करू शकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT