Dr Ambedkar and Blue Colour The Hindu
देश विदेश

Dr Ambedkar: दलितांसोबत निळ्या रंगाचं काय आहे कनेक्शन? डॉ.बाबासाहेब आंबेडकर का घालायचे याच रंगाचा कोट?

Dr Ambedkar and Blue Colour: राहुल- प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांचे नेत्यांनी निळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. आज आपण निळा रंगाचं दलितांच्या जीवनातील महत्त्व काय आणि निळा रंगाचं काय कनेक्शन आहे हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे राजकारण तापलंय. अमित शहा यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. काँग्रेसकडून अमित शहा यांच्या विधानाच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमित शहा यांनी केलेल्या विधानानंतर थंडीच्या मोसमातही दिल्लीतील राजकीय तापमान तापलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी निळ्या टी-शर्टमध्ये तर प्रियंका गांधी निळ्या साडीत संसदेत पोहोचले. शहा यांच्या भाषणावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळाविरोधात आज राहुल-प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बाबासाहेबांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी निळ्या पोशाख परिधान केला होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या कपड्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं.

यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली आणि अनेक खासदार जखमी झाले पण राहुल गांधींच्या निळ्या रंगाचा टीशर्ट आणि प्रियांकाच्या निळ्या रंगाच्या साडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र निळ्या रंगाचा बाबासाहेबांशी काय संबंध? हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

काय आहे निळा रंग आणि दलितांचं कनेक्शन?

खरे तर दलित चळवळ सुरुवातीपासून निळ्या रंगाशी जोडली गेली आहे. याची कारणे आहेत, हे जाणून घेऊ. आकाशाचा रंग आहे निळा आहे, त्या आकाशाखाली सर्वजण समान आहेत. यात कोणताच भेद नाहीये कोणी उच्च कोणी नीच्च नाहीये. हा रंग व्यापकतेचा प्रतिक आहे. यानुसार निळा रंग हा समानता आणि स्वतंत्रताचा प्रतिक आहे. म्हणजेच काय हा रंग विषमतेच्या विरोध करणारं आहे.

याचमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही निळ्या रंग पसंत होता. म्हणूनच ते नेहमी निळ्या रंगाचा सूट घालायचे. त्यामुळे डॉ.बाबासाहेबांचा पुतळा नेहमी निळ्या कोटमध्ये दिसतो. त्यांचा पुतळा हा एका हातात राज्यघटनेचे पुस्तक आणि दुसऱ्या हातात बोट उंचावलेला असतो. ते प्रगतीचे संकेत असतं. डॉ. बाबासाहेबांनी १९४२ मध्ये शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया पार्टीची स्थापना केली होती. त्या पक्षाचा झेंडा हा निळ्या रंगाच होता आणि त्यात अशोक चक्र होतं.

यानंतर १९५६ मध्ये जुना पक्ष संपुष्टात आणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्यातही हाच निळा झेंडा वापरण्यात आला. नंतर बसपानेही हा रंग स्वीकारला आणि त्यामुळे निळा रंग दलित अस्मिता आणि चळवळीचे प्रतीक बनलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT