Milk War In Karnataka Saam Tv
देश विदेश

Karnataka assembly elections 2023: विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात दूधावरून राजकीय संघर्ष, अमूल की नंदिनी; नेमका काय आहे वाद?

Nandini Vs Amul War : विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात दूधावरून राजकीय संघर्ष, नेमका काय आहे वाद?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karnataka assembly elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 मे 2023 रोजी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्याआधी कर्नाटकात अमूल (Amul Dairy company) ब्रँडचा प्रवेश हा राज्यातील सर्वात मोठा निवडणूक मुद्दा बनला आहे.

नंदिनी (Nandan Dairy) हा कर्नाटकातील अतिशय लोकप्रिय स्थानिक दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड आहे. मात्र अमूलच्या प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. कर्नाटकातील दूध आणि डेअरी मार्केटवर नंदिनीचे वर्चस्व आहे.

नंदिनी आणि अमूल यांच्यात वाद सुरू झाला जेव्हा अमूलने कर्नाटकमध्ये ऑनलाइन आणि ई-कॉमर्स मार्केटद्वारे डेअरी उत्पादने विकण्याची घोषणा केली. यातच कर्नाटकात अमूलच्या प्रवेशामुळे नंदिनी ब्रँडला धक्का बसेल आणि बेंगळुरू बाजारपेठेतील त्याचे वर्चस्व संपुष्टात येईल, अशी भीती कर्नाटकात वाढली आहे. (Latest Marathi News)

दूध बाजारातील नंदिनी आणि अमूल यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईने राजकीय वळण घेतले आहे. स्थानिक दूध ब्रँड नंदिनीला अमूलकडून मिळणाऱ्या आव्हानाला काँग्रेसने कर्नाटकच्या अस्मितेशी जोडले आहे.

अमूलच्या प्रवेशाचा मुद्दा आता निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. असं असलं तरी कर्नाटकात नंदिनीला आव्हान देणे अमूलसाठी इतके सोपे नाही. कारण तिथल्या बाजारात नंदिनी ज्या किमतीला दूध विकते, तिथं अमूलला तिच्यासमोर टिकणं फार कठीण आहे.

अमोलपेक्षा नंदिनी ब्रँडच्या दुधाची किंमत किमी

कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघाच्या (KMF) नंदिनी ब्रँड आणि गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (GCMMF) अमूल ब्रँडच्या दुधाच्या किमतींची तुलना केल्यास, नंदिनी अमूलपेक्षा सरस ठरते. अमूलच्या तुलनेत नंदिनीच्या दुधाचे दर खूपच कमी आहेत.

नंदिनीच्या टोन्ड दुधाची किंमत फक्त 39 रुपये प्रति लिटर आहे, त्यात 3 टक्के फॅट आणि 8.5 टक्के एसएनएफ असते. त्या तुलनेत अमूलच्या टोन्ड दुधाची किंमत दिल्लीत 52 रुपये आणि गुजरातमध्ये 54 रुपये प्रति लिटर आहे.

दरम्यान, विरोधकांच्या हल्ल्यानंतर बॅकफूटवर आलेले राज्याचे भाजप सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमूल ब्रँडच्या प्रवेशामुळे नंदिनी ब्रँडला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारली आहे. नंदिनीचे अमूलमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. अमूलच्या प्रवेशावर राजकारण होता कामा नये, असे ते म्हणाले.

दुसरीकडे अमूलचे म्हणणे आहे की ते उत्तर कर्नाटकातील बेळगाव आणि हुबळी-धारवाडमध्ये 2015 पासून अमूलचे दूध विकत आहे. फक्त ऑनलाइन ई-कॉमर्स मार्गाने ते बेंगळुरूमध्ये प्रवेश करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT