America News  Saam TV
देश विदेश

Viral News : अजब योगायोग! रुग्णालयातील 12 नर्स एकाच वेळी गर्भवती

America Nurses News : अमेरिकेच्या व्हर्जिनिया हॉस्पिटलमधील रिजनल मेडिकल सेंटर टीमच्या एकूण 12 नर्स एकत्रितपणे गर्भवती झाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Viral News : अमेरिकेतील एका रुग्णालयात भलताच योगायोग जुळून आला आहे. रुग्णालयातील 12 नर्स एकाच वेळी गर्भवती आहेत. या घटनेची अमेरिकेसह जगभरात चर्चा होत आहे.

अमेरिकेच्या व्हर्जिनिया हॉस्पिटलमधील रिजनल मेडिकल सेंटर टीमच्या एकूण 12 नर्स एकत्रितपणे गर्भवती झाल्या आहेत. या 12 महिलांपैकी 11 नोंदणीकृत नर्स असून एक युनिट सेक्रेटरी आहे.

यातील दोन महिलांनी यापूर्वीच दोन मुलांना जन्म दिला आहे. एका महिला कर्मचाऱ्याने 15 मार्च रोजी एका मुलीला तर दुसऱ्या महिलेने 16 मे रोजी मुलीला जन्म दिला.

यूएस टुडेच्या वृत्तानुसार, हेली ब्रॅडशॉ नावाच्या नर्सने म्हटलं की, मी खूप भाग्यवान आहे की मला या अवस्थेत पाठिंबा देण्यासाठी इतर अनेक नर्स आहेत. जर आम्हाला कशाचीही गरज असेल तर आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. आम्ही एकमेकांना मदत करतो. (Latest Marathi News)

पुढील महिन्यात तीन नर्स बाळाला जन्म देणार आहेत. याशिवाय ऑगस्टमध्ये आणखी तीन महिला बाळंत होणार आहेत. उर्वरित 3 महिला अनुक्रमे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आई होणार आहेत. म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस रुग्णालयातील सर्व सर्व आई होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

SCROLL FOR NEXT