Weather Update  Saam tv
देश विदेश

Weather Update : देशात कुठे उष्णतेची लाट, तर कुठे बरसणार सरी; पुढील ३ दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या

Weather Update in Marathi : देशात पुढील काही दिवस उष्णतेची लाट पसरणार आहे. तर कुठे पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुढील ३ दिवस हवामान कसं असेल, जाणून घ्या.

Vishal Gangurde

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर प्रदेशासहित अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पर्वत रांगेत पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे तापमान घसरलं आहे. ओडिशामध्ये १५ ते १८ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पर्वतीय भागात अचानक वातावरणात मोठा बदल झाला आहे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर आता पर्वतीय भागात थंडीचा कडाकाही पसरू लागला आहे. बद्रीनाथमध्ये आज सकाळपासून बर्फवृष्टी सुरु आहे. बद्रीनाथ भागात एक फुटांहून अधिक बर्फ साचला आहे.

भगवान बद्री मंदिर परिसरातही बर्फाची चादर पसरली आहे. मार्च महिन्यात तराई भागात उन्हाळा सुरु झाला आहे. दुसरीकडे पर्वतीय परिसरात थंडीचा कडाका पसरला आहे. त्यामुळे या भागात बर्फवृष्टी होऊ लागली आहे. बद्रीनाथचे काही फोटो समोर येऊ लागले आहेत. पर्वतावर बर्फाची चादर पसरली आहे.

राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्याने तापमान घसरला आहे. ओडिशामध्ये १५ मार्च ते १८ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. झारखंड, विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर तेलंगणामध्ये १५ मार्च ते १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

कोल्हापूरच्या शाहुवाडीत आज शनिवारी मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शाहुवाडीत विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. पावसामुळे उष्णतेने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

SCROLL FOR NEXT