Mamata Banerjee Saam Tv
देश विदेश

Mamata Banerjee Latest News : '...तर मी राजीनामा देईल', ममता बॅनर्जी कडाडल्या; अमित शहांसंदर्भात केला होता खळबळजनक दावा

Mamata Banerjee : तर मी राजीनामा देईल', ममता बॅनर्जी कडाडल्या

Satish Kengar

Mamata Banerjee on Amit Shah : तृणमूल काँग्रेसचा (TMC) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला, मोठ्या प्रमाणात अशी अफवा पसरली आहे. यावर आता स्वतः ममता बॅनर्जी यांनी समोर येत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, टीएमसीला (TMC) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मी अमित शाह यांना फोन केल्याची चर्चा खरी सिद्ध करून दाखवली तर मी राजीनामा देईल.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर मी अमित शाह यांना चार वेळा फोन केला, अशी चर्चा आहे. असं सर्व खोटं पसरवणाऱ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करू. जे लोक असं खोटं पसरवत आहेत, त्यांना आम्ही माफी मागायला लावू. मला भारतीय राजकारण चांगलेच कळतं. आमच्या चार आमदारांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

'भाजप 2024 ची निवडणूक जिंकणार नाही'

ममता बॅनर्जी पुढे म्हणल्या की, भाजप सत्तेत आहे, त्यामुळे ते त्यांना हवे ते करत आहे. पण सत्ता तात्पुरती असते, सत्ता येते आणि जाते पण लोकशाही कायम राहील, हे त्यांना समजत नाही. संविधान कायम राहणार आहे त्यात काही सुधारणा होऊ शकतात. पण संविधान बदलता येत नाही. त्यामुळे ते (BJP) आगामी 2024 ची निवडणूक जिंकणार नाहीत.''

'2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 200 चा आकडा पार करू शकणार नाही'

त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आम्हला कोणाच्या कृपेने मिळालेला नव्हता. इतके आमदार-खासदार असतानाही आमचा भाजपला विरोध असल्याने आमचा हा दर्जा काढून घेण्यात आला. माझ्या पक्षाचे नाव ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असे राहणार. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 200 जागांचा आकडा पार करू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

SCROLL FOR NEXT