Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

BJP Dissolves Datia District Executive After Bypoll Defeat: दतिया पोटनिवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय; भाजपचा धक्का बसताच जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. पक्षात मोठे फेरबदल आणि अंतर्गत वाद उघड.
Congress candidate Ghanshyam Singh celebrates victory in Datia bypoll as BJP faces major setback and dissolves district unit.
Congress candidate Ghanshyam Singh celebrates victory in Datia bypoll as BJP faces major setback and dissolves district unit.Saam Tv
Published On

मध्यप्रदेशच्या दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला अन् काँग्रेसच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवला. भाजपने या मतदारसंघातून आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने घनश्याम सिंह यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले होते. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून घनश्याम सिंह 6029 मतांनी विजयी झाले. यानंतर भाजपने थेट जिल्हा कार्यकरणी रद्द केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने या निकालाची चांगलीच धास्ती घेतली असून याच पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहे.

Congress candidate Ghanshyam Singh celebrates victory in Datia bypoll as BJP faces major setback and dissolves district unit.
बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

दरम्यान याआधी मध्यप्रदेश भाजपने असाच निर्णय घेतला होता. दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपने कडक पाऊल उचलत दातियामधील सर्व कार्यकारणी तात्काळ बरखास्त केली. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. भोपाळ येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, पराभवाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे,. यासाठी दोन सदस्यीय उच्चस्तरीय समिति नेमण्यात आली होती, यामध्ये प्रदेश संघटन महामंत्री गौरव रणदीवे आणि वरिष्ठ नेते अंबाराम कराडा यांचा समावेश आहे.

Congress candidate Ghanshyam Singh celebrates victory in Datia bypoll as BJP faces major setback and dissolves district unit.
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; वाचा क्षणाक्षणाची अपडेट

सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांनी काही नेत्यांकडून अंतर्गत विश्वासघात झाल्याची तक्रार केली. त्यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगही दाखवल्याचे सांगितले जात आहे. दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा ६,०१६ मतांनी पराभव केला.

Congress candidate Ghanshyam Singh celebrates victory in Datia bypoll as BJP faces major setback and dissolves district unit.
खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

तर मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या निर्देशानुसार प्रदेश काँग्रेस कमिटीमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयानंतर आता नव्याने संघटन पुनर्रचना केली जाणार आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांनी 5 ऑगस्ट अधिकृत पत्र जारी केले असून संघटन मजबूत करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्व फेरबदलाची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी, मध्यप्रदेशचे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. लवकरच मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये नव्या विभागांची, पदाधिकाऱ्यांची आणि नवीन कार्यकारणीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com