Manasvi Choudhary
संध्याकाळच्या वेळी चहाची सोबत काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खावंसं वाटतं असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी ट्राय करू शकता.
क्रिस्पी मखाना चिवडा ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा. हा एक हेल्दी नाश्ता होईल.
क्रिस्पी मखाना चिवडा बनवण्यासाठी मखाने, शेंगदाणे, मसाला, मीठ, तूप हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी गॅसवर एका कढईमध्ये गरम तूपामध्ये मखाने परतून घ्या. मखाने कुरकुरीत फ्राय करा. नंतर या मिश्रणात शेंगदाणे देखील फ्राय करा .
नंतर त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करा.
या मसाल्यामध्ये भाजून ठेवलेले कुरकुरीत मखाने टाका. चमच्याने सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.