Surabhi Jayashree Jagdish
फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साचणे. सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत. मात्र आजार वाढू लागल्यास त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांप्रमाणेच पायांवरही दिसू शकतो.
लिव्हरच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी साचली की त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. सुरुवातीला हा आजार कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता हळूहळू वाढतो. मात्र योग्य वेळी निदान झाल्यास आणि जीवनशैलीत आवश्यक बदल केल्यास ही समस्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
अयोग्य आहार, विशेषतः जास्त तेलकट, तळलेले आणि साखरयुक्त पदार्थांचं अतिसेवन, लठ्ठपणा, मधुमेह, इन्सुलिन रेझिस्टन्स, नियमित व्यायामाचा अभाव, मद्यपान तसंच वाढलेलं कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स यांसारख्या कारणांमुळे लिव्हरमध्ये चरबी साचू शकते.
फॅटी लिव्हरची काही लक्षणं पायांमध्ये दिसून येते मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं फॅटी लिव्हरबरोबरच हृदय, किडनी किंवा रक्तवाहिन्यांच्या इतर आजारांमुळेही दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन लिव्हर फंक्शन टेस्ट आणि इतर आवश्यक तपासण्या करून अचूक कारण शोधणं महत्त्वाचं आहे.
लिव्हरचं कार्य कमी झाल्यास शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे पाय आणि घोट्यांमध्ये सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
लिव्हर पोषक घटकांचं योग्य प्रकारे चयापचय करू शकत नसल्यास स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा, थकवा आणि कमी हालचालीनंतरही दमल्यासारखं वाटू शकतं.
लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यास स्नायूंना आवश्यक पोषक घटक आणि खनिजांचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे पोटऱ्यांमध्ये वेदना, गोळे येणं किंवा आकडी येण्याची तक्रार जाणवू शकते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.