Cm Eknath Shinde Latest News : मंत्रालयात उभारण्यात आलं मध्यवर्ती टपाल केंद्र, मुख्यमंत्री म्हणाले, सामान्यांना होणार फायदा

Mantralaya News : मंत्रालयात उभारण्यात आलं मध्यवर्ती टपाल केंद्र
Cm Eknath Shinde Latest News : मंत्रालयात उभारण्यात आलं मध्यवर्ती टपाल केंद्र, मुख्यमंत्री म्हणाले, सामान्यांना होणार फायदा

Mumbai: शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने वितरण होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे.

Cm Eknath Shinde Latest News : मंत्रालयात उभारण्यात आलं मध्यवर्ती टपाल केंद्र, मुख्यमंत्री म्हणाले, सामान्यांना होणार फायदा
Ajit Pawar Latest News: अजित पवारांच्या भेटीला आले नेते-आमदार कोण-कोण? लेटेस्ट यादी आली समोर

या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असून, त्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच, एकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे. (Maharashtra Latest News)

Cm Eknath Shinde Latest News : मंत्रालयात उभारण्यात आलं मध्यवर्ती टपाल केंद्र, मुख्यमंत्री म्हणाले, सामान्यांना होणार फायदा
Sanjay Raut on Ajit Pawar: 'शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली केली', संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com