BJP candidate Debanshu Panda secured a massive victory in the Falta bypoll in West Bengal Saam tv
देश विदेश

TMCचं 'डायमंड हार्बर मॉडेल' कोसळलं; फाल्टा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, मतांचा आकडा पाहून चकित व्हाल!

Falta Election Result 2026: पश्चिम बंगालमधील फाल्टा पोटनिवडणूक भाजपने जिंकली आहे. भाजपने एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी फाल्टाच्या जनतेचे आभार मानलेत. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने यापूर्वीच या स्पर्धेतून स्वतःला दूर केले होते.

Bharat Jadhav

  • फाल्टा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय.

  • देबांशु पांडा १ लाखांहून अधिक मतांनी विजयी.

  • टीएमसी उमेदवाराने आधीच निवडणुकीतून माघार घेतली होती.

पश्चिम बंगालमधील फाल्टा पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार देबांशु पांडा हे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेत. पांडा यांनी तब्बल १,०९,०२१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. सीपीआय(एम)चा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आला. भाजपच्या विजयावर मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांचे वक्तव्यही समोर आले आहे. फाल्टामधील विजयावर सुभेंदू अधिकारी म्हणाले, "मी फाल्टाच्या जनतेला सलाम करतो." टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान यांनी या निवडणुकीतून आधीच माघार घेतली होती.

रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीत जनतेने एकतर्फी भाजपवर विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. या यशानंतर भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर लिहिले की, 'डायमंड हार्बर मॉडेल कोसळले असून "भाईयो" चा अहंकार हरला आहे. सुवेंदू अधिकारींचे नेतृत्व आणि पीएम मोदींच्या व्हिजनमुळे जनतेने भाजपला निवडले.'

फाल्टामध्ये २९ एप्रिल रोजी मुख्य मतदान झाले होते. मात्र ईव्हीएममध्ये फेरफार आणि काही बूथवर ईव्हीएमवर अत्तर आणि चिकट टेप वापरल्याच्या तक्रारी आल्या होत्या. वेब कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्येही छेडछाड आढळून आल्यानं निवडणूक आयोगाने २९ एप्रिलचे मतदान रद्द केले होते. यानंतर सर्व २८५ बूथवर २१ मे रोजी पुन्हा मतदानाचा आदेश दिला होता. या पुनर्मतदानासाठी केंद्रीय दलाच्या ३५ कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT