भाजपच्या या प्रचंड विजयामागे पाच प्रमुख कारणे आहेत.
भाजपने राज्यातील महिला आणि तरुणांसह समाजातील सर्व घटकांना अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
बंगालमध्ये अंदाजे २७-३२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप लवकरच सत्ता मिळवणार असे सुतोवाच पंतप्रधान मोदींनी निवडणूक प्रचारात केलं होतं. मोदींचं हे विधान तंतोतंत खरं ठरताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक निकाल लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून बंगालच्या सत्तेवर अधिराज्य करणाऱ्या ममता बॅनर्जींना भाजपनं पराभूत केलंय. ऐतिहासिक विजयासह भारतीय जनता पार्टी बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
दुपारीपर्यंतच्या मतदान मोजणीच्या आकडेवारीनुसार, राज्यात पक्षाला प्रचंड मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. भाजप १९० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर दीड दशकापासून सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
टीएमसीला जागा शंभराच्या खाली आल्या आहेत.एकूण किती जागांवर ममता बॅनर्जींच्या पार्टीच विजय झाला आणि किती जागा गमावल्या याच्या अधिकृत आकडेवारीसाठी संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परंतु सध्याचे कल पाहता बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापित करणार आहे, हे निश्चित दिसत आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार लढा दिला, पण त्यांना केवळ ७७ जागांवर विजय मिळवता आला. परंतु यावेळी त्यांना ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात यश आले आहे. भाजपच्या या प्रचंड विजयामागे पाच प्रमुख कारणे आहेत.
बंगालमध्ये अंदाजे २७-३२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. याचा फायदा भाजपच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या पक्षांना नेहमीच झाला. गेल्या दीड दशकात टीएमसीला सातत्याने बहुसंख्य मुस्लिम मते मिळाली आहेत, त्याचा टीएमसीला मोठा फायदा झाला आहे. त्याला मुसलमान, महिला आणि तरुणांकडून मते मिळत राहिली.
काही जातींच्या समुहानेही टीएमसीला पाठिंबा दिला. परंतु यावेळी भाजपने हिंदूंना एकजूट केले. घुसखोरी, बांगलादेशी मुसलमान आणि एसआयआर यांसारख्या मुद्द्यांचा वापर करून भाजपने हिंदू मते मिळवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.