TMC Rebel Faction : तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी, तर अख्रुझमान यांची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती न्यायालयाने रद्द ठरवली आहे. विधानसभा अध्यक्षांना १० दिवसांत यावर फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या गटातील नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विरोधात ऋतब्रता बॅनर्जी यांनी बंडखोरी केली होती. त्या बंडखोर गटाला आज कोलकाता उच्च न्यायालयाने धक्का दिला. उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून ऋतब्रता बॅनर्जी यांची त्यांची नियुक्ती रद्द केली. या प्रकरणी नव्याने निर्णय देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांचा तो निर्णय रद्द केला. त्यांनी ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती.
पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेता कोण असावा? यावर १० दिवसांच्या आत पुनर्विचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस यांना दिले आहेत. न्यायमूर्ती कृष्णा राव यांनी विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) मुख्य प्रतोद म्हणून अख्रुझमान यांची नियुक्तीही रद्द केली. आता अध्यक्षांना १० दिवसांच्या आत दोन्ही पदांवर निर्णय घ्यावा लागेल.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल दिला. या याचिकेत विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांच्याशी संलग्न असलेले नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याच्या पूर्वी ठरलेल्या निर्णयाचे पालन करण्यास अध्यक्षांनी नकार दिला आणि त्याऐवजी बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली, हा मुख्य वादाचा मुद्दा होता. यावर हायकोर्टानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.