ABHISHEK BANERJEE HOUSE RAIDED BY POLICE IN KOLKATA, POLITICAL STORM ERUPTS IN WEST BENGAL Saam tv
देश विदेश

Abhishek Banerjee : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याच्या घरी पोलिसांची धाड, तब्बल ५ तास सुरु होता तपास

West Bengal Abhishek Banerjee News : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरावर पहाटे पोलिसांनी धाड टाकली.

Alisha Khedekar

  • अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर पोलिसांची धाड

  • प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला

  • जवळपास पाच तास तपास सुरु होता

  • धाडीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

  • पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राज्यातील स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. ममता बॅनर्जींची २० वर्षांची सत्ता गेल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील घरावर पहाटे पहाटे पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानी शनिवारी पहाटे पोलिसांनी धाड टाकली. पहाटेच्या सुमारास पोलिसांचे पथक अभिषेक बॅनर्जी यांच्या घरासमोर पोहोचले आणि बराच वेळ घरातील लोकांना हाक मारल्यानंतर कोणतंही उत्तर न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांसोबत महिला अधिकारीही उपस्थित होत्या. तसेच घराबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी घरातील विविध भागांची सखोल तपासणी केली. ही संपूर्ण कारवाई जवळपास पाच तास सुरू होती. सकाळी आठनंतर पोलिसांचे पथक घरातून बाहेर पडले.

घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) स्वतः कालीघाट येथील निवासस्थानी दाखल झाल्या. काही वेळ त्या तेथे थांबल्यानंतर पोलिसांची कारवाई संपताच त्या देखील तेथून निघून गेल्या. घराबाहेर पत्रकारांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि संपूर्ण घराची तपासणी केली. मात्र, घरातील प्रत्येक गोष्टीची नोंद आणि रेकॉर्ड उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही कारवाई नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या संदर्भात करण्यात आली याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गुरुवारी कोलकता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अभिषेक बॅनर्जी यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली होती. विधानसभा संबंधित कथित बनावट सही प्रकरणात त्यांची सुमारे साडेपाच तास चौकशी झाली होती. या घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT