देश विदेश

राजकीय संघर्ष पेटला! विरोधी पक्षाच्या खासदाराचं ऑफिस फोडलं, राजकीय वर्तुळात खळबळ

tmc mp office vandalized : पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचं ऑफिस फोडल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष पेटला

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासादाराचं ऑफिस फोडलं

ऑफिस फोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनानंतर देखील राजकीय संघर्ष कायम असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव, खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. तृणमूल काँग्रेसचा आणखी एक खासदार निशाण्यावर असल्याचे समोर आलं आहे. संतापलेल्या लोकांनी खासदार बापी हलदर यांचं ऑफिस फोडलं. खासदार हलदर यांचं ऑफिस फोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील मथुरापूर येथील कृष्णचंद्रपूर भागातील रविवारी सायंकाळी स्थानिक नागरिक आणि महिलांच्या एका गटाने खासदार बापी हलदर यांचं ऑफिस फोडलं. त्यांनी खासदाराच्या ऑफिसच्या नावाची पाटी आणि खिडकीच्या काचा देखील फोडल्या.

आंदोलनकर्त्यांनी खासदार बापी हलदर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. खासदार हलदर यांच्यावर स्थानिकांना धमकावल्याचा देखील आरोप आहे. त्यांनी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्या महिलांचं म्हणणं आहे की, SHG संघटनेच्या लाभार्थ्यांना पात्र असतानाही सरकारी लाभापासून वंचित ठेवण्यात आलं. खासदार हलदर यांच्यामुळे लाभाचं वितरण व्यवस्थित झालं नाही. अनेक पात्र लाभार्थ्यांना फायदा झाला नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. खासदाराने अनेक खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

तत्पूर्वी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण २४ परगना जिल्ह्याच्या मथुरापूरमधील टीएमसी खासदार बापी हलदर यांचं ऑफिस रविवारी स्थानिक लोकांनी फोडलं. त्यांच्यावर कार्यालयात बेकायदेशीर वस्तू ठेवल्याचा आरोप आहे. यावरून स्थानिकांनी कार्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार्यालयातील बेकायदेशीर वस्तू हटवल्या. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT