Rahul Gandhi Vs Mamata Banerjee Saam Tv
देश विदेश

Mamata Banerjee: 'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपला हरवून दाखवा', ममता बॅनर्जी काँग्रेसवर संतापल्या

Satish Kengar

Mamata Banerjee Vs Rahul Gandhi:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी म्हणाल्या की, 'आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस 40 जागाही मिळवू शकेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.'

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता यांनी हे वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये आज एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ''मला माहित नाही की काँग्रेस 300 पैकी 40 जागा जिंकेल की नाही. मग हा अहंकार का? तुम्ही बंगालला आलास पण मला सांगितलंही नाहीस. आम्ही इंडिया आघाडीचा भाग आहोत. हिम्मत असेल तर वाराणसीत भाजपला हरवून दाखवा, पूर्वी जिथे जिंकायचे तिथेही हरले.''  (Latest Marathi News)

त्या म्हणाल्या की, ''काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये आली होती. पण मला त्याची माहितीही देण्यात आली नाही. आम्ही इंडिया आघाडीचे मित्र आहोत आणि मला माझ्या पक्षाच्या नेत्यांकडून याची माहिती मिळाली.''

भारत जोडो न्याय यात्रेबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राहुल गांधी विडी कामगारांशी बोलताना दिसत होते. त्या म्हणाल्या, 'आता फोटोशूट करण्याची ही नवी स्टाइल सुरू झाली आहे. चहाच्या टपऱ्यावरही न गेलेले लोक आता विडी कामगारांसोबत बसण्याचे नाटक करत आहेत. हे सर्व स्थलांतरित पक्ष्यांसारखे आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात राहुल गांधी विडी विक्रेत्यांसोबत बसलेले आणि बोलत असल्याचे दिसत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

SCROLL FOR NEXT