West Bengal college abuse incident sparks outrage Saam tv news
देश विदेश

Shocking: 'रक्त वाहू लागलं, ४० मिनिटे शोषण' तरूण नेत्यानं कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अब्रूचे लचके तोडले; परिसरात खळबळ

TMCP Leader Manojit Mishra: पश्चिम बंगालमधील लॉ कॉलेजमधील बलात्कारप्रकरणात आरोपींची कोठडी ८ जुलैपर्यंत वाढवली; पीडितेने माजी विद्यार्थी आणि टीएमसीपी नेत्यावर गंभीर आरोप करत धक्कादायक खुलासा केला.

Bhagyashree Kamble

पश्चिम बंगालमधील लॉ कॉलेजमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तिन्ही आरोप पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या पोलीस कोठडीत मंगळवारी ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक महाविद्यालयीन माजी विद्यार्थी आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मनोजित मिश्रा मुख्य आरोपी असून, तो दक्षिण कोलकाता टीएमसीपी (तृणमूल छात्र परिषद) पक्षाचा सरचिटणीस आहे. कोलकातामधील ही घटना उघडकीस आल्यानंतर मिश्राविरोधातील बरेच गुन्हे समोर येत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, एका विद्यार्थिनीने मनोजितवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, '२०२३ साली कॉलेजमधील सीनियर्स ज्युनियर्सची पिकनिक निघाली होती. आम्ही सर्वे एन्जॉय करत होते. मी त्यांच्यात नवीन होते. माझी ट्रेनमध्ये मनोजितसोबत ओळख झाली. बागान बारीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये २ खोली होते. एक खोली मुलांसाठी आणि एक खोली मुलींसाठी होती. तेथे पोहोचल्यानंतर मनोजित दारू प्यायला बसला. काही मुलेही त्याच्यासोबत दारू पित होती.'

'मी खोलीच्या बाहेर असलेल्या बाकावर बसले. मागून माझ्या मनोजित कधी आला कळालं नाही. त्याने मी काही बोलण्याच्या आत माझे केस धरले. मला ओढत खोलीमध्ये नेलं, मी त्यावेळी घाबरले. मला जाऊ देण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने माझा फोन घेतला. त्याने माझ्या अब्रूचे लचके तोडले. त्याने माझ्या अंतर्वस्त्राच्या आत हात घातला. मी रडायला सुरूवात केली. त्याने जोरात चावा घेतला. रक्त वाहू लागले. आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तो गाण्याचा आवाज वाढवत होता', अशी माहिती पीडितेनं दिली.

'हा प्रकार ४० मिनिटे सुरूच होता. गेटजवळ कुणीतरी आल्यानंतर तो पळून गेला. मी खाली पळत गेले, रक्त साफ गेले आणि बाकावर बसली. त्याने पुन्हा मला पकडण्याचा प्रयत्न केला. पण मी पळून गेले. यानंतर तिने तक्रार दाखल करण्याचा विचार केला. पण मनोजितच्या गँगने धमकी दिली होती. मनोजित काही क्षणात घर उद्ध्वस्त करेल, अशी धमकी दिली. यामुळे मी शांत राहिली', अशी माहिती पीडितेनं दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT