West Bengal Politics  Saam tv
देश विदेश

मोठी बातमी! राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

West Bengal Politics : पश्चिम बंगालचे राज्यपालांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस यांनी पदाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याची चर्चा

राजकीय घडामोडीमुळे राजकारणात खळबळ

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. सीवी आनंद बोस यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ. सीवी आनंद बोस यांची १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्याआधी मणिपूरचे तत्कालीन राज्यपाल ला गणेशन हे अतिरिक्त प्रभार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपालपद सांभाळत होते. बोस यांना पश्चिम बंगालचं राज्यपालपद सोपवण्यात आलं. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखड यांची भारताच्या उपराष्ट्रपती नियुक्ती करण्यात आली होती.

सीवी आनंद बोस हे १९७७ सालच्या बॅलचे आयएएस अधिकारी होते. ते केरळचे कोट्टायम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते लेखक देखील आहेत. त्यांची इंग्रजी, मल्याळम आणि हिंदीसहित ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

जवाहरलाल नेहरू फेलोशिपने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विकास अजेंडा तयार करणाऱ्या कार्यगटाचे अध्यक्षपद बोस यांनी भुषवलं आहे. त्यावेळी सर्वांसाठी परवडणारी घरे ही संकल्पना मोदी सरकारने स्वीकारली होती.

लडाखच्या उपराज्यपालांचा राजीनामा

लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांनी गुरुवारी अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे कारण समोर आलेलं नाही. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस यांच्या राजीनाम्यानंतर लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांनीही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कविंद्र गुप्ता यांनी १८ जुलै २०२५ रोजी लडाखच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. गुप्ता यांच्याआधी ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांच्याकडे पद होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT