West Bengal Polls Clash Saam Tv
देश विदेश

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

West Bengal Polls Clash : पश्चिम बंगालमधील मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात मुर्शिदाबादमध्ये टीएमसी आणि हुमायून कबीर समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दगडफेक, लाठीचार्ज आणि तणावपूर्ण वातावरणामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Alisha Khedekar

  • मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान हिंसक संघर्ष

  • टीएमसी आणि हुमायून कबीर समर्थक आमने-सामने

  • दगडफेक व लाठीचार्जमुळे तणाव वाढला

  • सिलीगुडी आणि आसनसोलमध्येही वादाच्या घटना

  • कडक सुरक्षेतही निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न

West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन गट आपापसात भिडले असल्याची घटना समोर आली आहे. मतदान सुरू असतानाच तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि हुमायून कबीर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या संघर्षामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या भागीरथपूर परिसरात दोन्ही गट आमने-सामने आले. वाद वाढत जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दगडफेक सुरू झाली. हुमायून कबीर यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

या गोंधळात सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत वातावरण आणखी तापवले. हुमायून कबीर यांच्या पक्षाने टीएमसी समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे, तर टीएमसीकडूनही यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल रात्री नाओदा परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तणावाची ठिणगी पडली होती. आज सकाळी हुमायून कबीर घटनास्थळी पोहोचल्यानंतर पुन्हा संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. कबीर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला की, टीएमसी समर्थकांनी मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण केले.

याचबरोबर, मुर्शिदाबादव्यतिरिक्त सिलीगुडी आणि आसनसोलमध्येही तणावाच्या घटना घडल्या. सिलीगुडीतील एका मतदान केंद्रावर भाजप उमेदवार शंकर घोष आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, तर आसनसोलमध्ये पोलिसांनी भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांना अडवल्याने वाद निर्माण झाला.

आज राज्यातील १६ जिल्ह्यांमधील १५२ जागांसाठी मतदान होत असून, कडक सुरक्षा व्यवस्था असूनही अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या पोलिस आणि सुरक्षा दल परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

Kalyan: छातीत दुखू लागल्याने १०८ ला कॉल केला, पण रुग्णवाहिकेला ४० मिनिटं उशिर; तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू, कल्याणमधील संतापजनक घटना

Rupali Bhosle Photos: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

Hair Care: हेअर बोटॉक्स करायचा विचार करताय? मग जाणून घ्या ३ महिन्यांनंतर होणारे साइड इफेक्ट्स

SCROLL FOR NEXT